तुळजापुर: गोर सेनेचे जळकोट येथे रास्तारोको आंदोलन
धाराशिव -गोर बंजारा समाजाच्या विविध मागण्यांसाठी धाराशिव जिल्हा गोर सेनेच्या वतीने सोमवारी (दि.18) तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले गोर बंजारा समाजातील सर्व संघटनांनी आंदोलनात सहभाग नोंदवला.
विमुक्त जाती (अ) प्रवर्गात अवैध मार्गाने खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणार्या व अवितरित करणार्या संबंधित अधिकार्यांवर व लाभार्थीवर कारवाई करण्यासाठी विशेष तपासणी पथक (एसआयटी) नेमण्यात यावे, संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात वैधता पडताळणी समितीमध्ये विमुक्त जाती (अ) प्रवर्गातील एक शासकीय प्रतिनिधी नियुक्त करावा, 2017 चा रक्त नातेसंबंधीचा जीआर त्वरीत रद्द करावा, दरवर्षी महाराष्ट्रात मूळ राजपूत भामटा व व्ही.जे. (अ) प्रवर्गातील सर्व जातीचे लोक प्रत्यक्षात कुठे निवासी राहतात, त्या तालुका व जिल्हानिहाय यादी बार्टीकडून जाहीर करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. तरी विमुक्त जाती (अ) प्रवर्गातील व गोर बंजारा समाजातील सर्व संघटनांनी या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला यावेळी महामार्गावर दिड तास आंदोलन करण्यात आले दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता
या आंदोलनात विजय चव्हाण,गोर सेना जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव,राजू चव्हाण,प्रकाश राठोड,कालिदास चव्हाण,मोहन राठोड,मधुकर जाधव,पिंटू चव्हाण,सुरज राठोड, जगन्नाथ चव्हाण, तुकाराम राठोड, दिनेश जाधव, अनिल जाधव, संजय जाधव, पवन राठोड, सुनील राठोड, राजाभाऊ राठोड यांचेसह गोर बंजारा समाजातील सर्व संघटनेचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
______________________________________________________
0 Comments