Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव : कळंब व वाशी येथील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत साहित्य वाटप

धाराशिव : कळंब व वाशी येथील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत साहित्य वाटप

धाराशिव/ प्रतिनिधी : धाराशिव लोकसभा मतदार संघातील कळंब व वाशी येथे दिव्यांग बांधवांना सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली, जिल्हा प्रशासन, समाज कल्याण विभाग, धाराशिव व मा.खा.ओमप्रकाशराजे  निंबाळकर व आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या विशेष सहकार्याने दि. 17/04/2023 ते 24/04/2023 या कालावधी मध्ये संपूर्ण मतदार संघात दिव्यांग बांधवाचे तपासणी शिबीराचे आयोजन केले होते. ADIP योजने अंतर्गत मोफत कृत्रीम अवयव व साहित्य साधने वाटपासाठी संपुर्ण लोकसभा मतदार संघातील धाराशिव जिल्हयातील कळंब येथे कळंब पंचायत समितीच्या कार्यालय परिसरामध्ये मध्ये एकुण 497 पात्र दिव्यांगना तसेच धाराशिव जिल्हयातील वाशी तालुक्यात पंचायत समिती कार्यालय परिसरामध्ये 102 पात्र दिव्यांगना, विविध कृत्रिम अवयव व साहित्य वाटप खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील व सहसंपर्क प्रमुख नंदुभैय्या राजेनिंबाळकर व शिवाजी आप्पा कापसे यांच्या हस्ते  पात्र लाभार्थ्यांना सायकल, व्हील चेअर, कुबडीजोडी, श्रवणयंत्र, सी. पी. चेअर, अंधकाटी, स्मार्ट फोन,स्टीक, आदी साहित्य गरजु व पात्र लाभर्थ्यांना वाटप करण्यात आले.


याप्रसंगी प्रदिप बप्पा मेटे उपजिल्हाप्रमुख, प्रा. दिलीप पाटील जिल्हा संघटक, भारत सांगळे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, बालाजी जाधवर माजी जि.प. सदस्य, गटविकास अधिकारी श्री. चकोर, मनोहर धोंगडे, विश्वजीत जाधव, शाम खबाले, संजय होळे, मधुकर बोन्दर, अण्णा तनमोर प. स. सदस्य, नासेर पठाण, सोमनाथ मडके, सचिन काळे विधानसभा प्रमुख, सुदाम मडके, गोविंद चौधरी, अश्रुबा बिक्कड, सुलेमान मिर्झा, शैलेश शिंदे, महादेव मगर, विजय कुरुंद, व्यंकटेश थोरात, नितीन सावंत, विनोद पवार, अण्णा राखुंडे, सचिन हिरे आदींसह असंख्य नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments