दिव्यांगाच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर
धाराशिव : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून धाराशिव लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली जिल्हा प्रशासन समाज कल्याण विभाग धाराशिव व खासदार ओमप्रकाश राजानिंबाळकर व आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या विशेष सहकार्याने दिनांक 17/04/2023 ते 24/04/2023 या कालावधीमध्ये संपूर्ण मतदारसंघात दिव्यांग बांधवांचे तपासणी शिबिराच्या आयोजन केले होते ए.डी.आय.पी योजनेअंतर्गत मोफत तर कृत्रिम अवयव व साधने वाटपासाठी संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यांमध्ये या शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते आज धाराशिव पंचायत समिती कार्यालयाच्या आवारामध्ये पात्र दिव्यांग बांधवांसाठी मोफत साहित्याचे वाटप खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील, सह संपर्कप्रमुख मकरंद उर्फ नंदू भैय्या राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना मागील 40 वर्षांपासून दिव्यांग बांधवांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या केद्र सरकाच्या बांधवांना सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या योजनेतून साहित्याचे वाटप करताना मला दिव्यांग बांधवांसाठी काहीतरी करता आले याचे समाधान होत आहे तसेच जिल्हाभरातील पात्र दिव्यांग बांधवांचे जीवन सुसाह्य करण्याकरिता आवश्यक असणारी विविध उपकरणे देऊन त्यांना समाजाच्या प्रवाहामध्ये व स्वावलंबी तसेच दिव्यांग बांधवांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करता आला. माझ्या सह आमदार कैलास दादा पाटील यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने केद्र सरकार सामाजिक न्याय व अधिकार्यता मंत्रालय यांच्या माध्यमातून जिल्हाभरातील सर्व दिव्यांग बांधवापर्यंत पोहोचून त्यांना सहकार्य करता आले व यापुढे दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी जे जे शक्य आहे ते सर्वतोपरी करण्याचा आपला मानस आहे असे उद्गार कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी काढले.
ए डी आय पी योजनेअंतर्गत मोफत कृत्रिम अवयव व साहित्य वाटपासाठी धाराशिव पंचायत समिती कार्यालय परिसरामध्ये आज एकूण 428 पात्र लाभार्थीपैकी 400 दिव्यांगांना विविध साहित्य वाटप खासदार होऊन ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील व सहसंपर्कप्रमुख नंदुभैय्या राजानिंबाळकर यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना सायकल, कुबडी जोडी, श्रवण यंत्र, सी.पी.चेअर, अंधकाटी, स्मार्टफोन, आधी साहित्य गरजू व पात्र लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.
यावेळी तालुकाप्रमुख सतिशकुमार सोमाणी, युवासेना विभागीय सचिव तथा जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे, माजी उपसभापती पं.स शाम भैय्या जाधव, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, प्रहार जिल्हाध्यक्ष मयूर काकडे,नगरसेवक गणेश खोचरे,युवासेनेचे दिनेश बंडगर, तसेच विशनु वैरागड सत्यम दिव्याग संस्था परभणी तसेच अलीम्को चे डॉ.सुजन भालेराव, डॉ.गौरीश सोलंके डॉ.निहाश कुमार कानपुर शाम यादव कानपुर किरण पावरा अभिजित देशमुख,प्रा.रामकृष्ण मते सर,माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे, गटविकास अधिकारी ढवळशंख,कक्ष जिल्हाप्रमुख मोईन पठाण, रवी कोरे, पांडुरंग माने, महेश लिमये, राकेश सूर्यवंशी, सत्यजित पडवळ, अजित बाकले आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक, नागरिक उपस्थित होते.
0 Comments