जिल्हाध्यक्ष मा.श्री.महेंद्र काका धुरगुडे यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव तालुका उपाध्यक्ष, गटप्रमुख व गणप्रमुख यांच्या नियुक्ती व शिंगोलि,वाघोली व घाटंग्री येथील ग्रामस्थांचा जाहीर पक्षप्रवेश
धाराशिव: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) धाराशिव तालुका उपाध्यक्षपदी सुनील वृषिकेत शिंदे, उपळा गटप्रमुख पदी विकास विश्वनाथ खडके, आंबेजवळगाव गण प्रमुख पदी सचिन दत्तू शिंदे, शिंगोली गणप्रमुख पदी विक्रम साहेबराव राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांच्या हस्ते तसेच धाराशिव तालुकाध्यक्ष मा.प्रशांत फंड यांच्या उपस्थितीमध्ये नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
मा.श्री.महेंद्र काका धुरगुडे यांच्या नेतृत्वाखाली घाटंग्री येथील ग्रामस्थ व युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार साहेब गटामध्ये जाहीर पक्ष प्रवेश झाला. विक्रम राठोड, शंकर गाढवे, हनुमंत थोरात, अशोक अंकुश,समाधान शिंदे, शहाजी हराळे, रामा थोरात, एकनाथ थोरात, प्रदीप कांबळे, दीपक कांबळे, शरणार्थी सिद्रामाप्पा, बालाजी कांबळे, तुकाराम थोरात, सिद्धनाथ बिचकुले यांचा पक्षामध्ये जाहीर प्रवेश झाला. या सर्व कार्यकर्त्यांचे जिल्हाध्यक्ष यांनी पक्षांमध्ये स्वागत केले. या सर्व कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे तालुक्यामध्ये पक्षाचा मोठा जनसंपर्क वाढला असून याचा पक्षाला मोठा फायदा होणार आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मा.महेंद्र काका धुरगुडे यांनी तालुकाउपाध्यक्ष, गट प्रमुख, गण प्रमुख पदी काम करण्याची आम्हाला संधी दिली आहे. या संधीचे आम्ही सर्व पदाधिकारी सोनं करू.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी सर्वातोपरी प्रयत्न करणार तसेच धाराशिव तालुक्यातील कार्यकर्ते यांचे संघटन मजबूत करू असे राष्ट्रवादीच्या नवनियुक्त पदाधिकारी यांनी सांगितले.
धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक भक्कम करण्यासाठी टाकलेलं एक सकारात्मक पाऊल म्हणायला हवं. या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मनापासून स्वागत. सगळ्यांना सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, असं जिल्हाध्यक्ष मा.महेंद्र काका धुरगुडे म्हणाले. राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.ना अजित दादा पवार साहेब यांच्या माध्यमातून व जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते यांच्या प्रयत्नाने त्यांचे गाव,तालुका,जिल्हा पातळीवरील प्रश्न सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करू, असंही जिल्हाध्यक्ष यावेळी म्हणाले.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे, यांच्या सोबत धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड, अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस खलील पठाण, अल्पसंख्यांक माजी जिल्हाध्यक्ष असद खान पठाण, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, धाराशिव युवक तालुकाध्यक्ष बालाजी शिंदे, नितिन चव्हाण, केशेगाव जि.प.गटप्रमुख लिंबराज लोखंडे, आंबेजवळगाव जि.प.गटप्रमुख सुरेश राठोड, शिंगोली विभाग प्रमुख बुबासाहेब पवार,चंद्रकांत राठोड, अरफात काझी, समीर खतीब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते़.
_________________________________________________
आपल्या परिसरातील बालाघाट न्यूज टाइम्स या यूट्यूब चैनल वरील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://youtube.com/@balaghatnewstimes?feature=shared
परिसरातील बातम्या पाठवण्यासाठी मो.9881298946 या नंबर वर व्हाट्सअप करू शकता.
संपादक : राजगुरु साखरे.
0 Comments