Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर तालुक्यातील अणदूर येथील खंडोबा यात्रेस उद्यापासून प्रारंभ, विविध धार्मिक कार्यक्रमासह कुस्ती स्पर्धेचे अयोजन

तुळजापुर तालुक्यातील अणदूर येथील खंडोबा यात्रेस उद्यापासून प्रारंभ, विविध धार्मिक कार्यक्रमासह कुस्ती स्पर्धेचे आयोजन

धाराशिव: तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथील ग्रामदैवत श्री खंडोबाची यात्रा प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी मार्गशीर्ष शुक्ल 1 बुधवार दिनांक 13 पासून सुरुवात होत आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी पहाटे चार वाजता काकड आरती नंतर परिसरातील भाविक दंडवत घालून आपापले नवस्फूर्ती फेडतात सकाळी मूर्तीला अभ्यंग स्नान घालून अभिषेक व विविध धार्मिक विधी पूर्ण करण्यात येतात. दिवसभर मंदिरात भाविक तळी भंडारा उचलणे, ओटी भरणे, भंडार खोबरे उधळणे, लहान मुलाचे जावळ काढणे, लंगर तोडणे, नवीन मुरळी वारूंना दीक्षा देणे आदी धार्मिक कार्यक्रम होतात, तर सायंकाळी मानाची काठी मिरवणूक वाघ्या मुरळी नृत्य धनगरी ओव्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे.


रात्री दहा वाजता श्रीचा अशुरूपी सवाद्य छबिना काढून मंदिराला दोन प्रदक्षिणा घातल्या जातात, यावेळी हलगीच्या तालावर खंडोबाचे वारू बेभान होऊन नाचतात हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात छबिना मिरवणुकीनंतर ज्येष्ठ वारू कडून आगामी वर्षाची भाकणूक  सांगितले जाते. रात्री बारा वाजता नळदृग चे मानकरी श्रींच्या मूर्तीला मैलारपूर नळदृग येथे नेण्यासाठी सवाद्य मिरवणुकीने येतात यावेळी त्यांचे स्वागत करून यात्रा कमिटीच्या वतीने मानपान देऊन दोन गावांमध्ये देव घेण्याचा लेखी करार होऊन दोन्ही गावातील पंचाच्या सह्या होतात त्यानंतर महारती होते मैलारपूर नळदुर्ग येथे पौष पौर्णिमे दिवशी होणाऱ्या यात्रोत्सवासाठी हेगडी प्रधानासह म्हासळसादेवीच्या मूर्तीचे प्रस्थानानंतर श्रींच्या मूर्तीला पालखीतून निरोप देण्यात येतो. गुरुवारी दिनांक 14 रोजी पहाटे पाच वाजता मैलारपुर येथील मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे .यात्रेनिमित्त मंदिरावर लक्षवेधक व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे . यात्रेनिमित्त गुरुवारी दिनांक 14 रोजी जवाहर महाविद्यालयाच्या कुस्त्याच्या आखाड्यात भव्य कुस्त्याचा  फड रंगणार आहे .भाविकांनी व ग्रामस्थांनी सहकार्य करावे अशी आव्हान देवस्थान ट्रस्ट व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे .येथील श्रींचे मूर्तीची वैशिष्ट्ये म्हणजे ही मूर्ती चलस्वरूपाची असून एकच मूर्ती दोन मंदिरे दोन यात्रा तसेच या दोन्ही मंदिरात  अणदुरचेच पुजारी पूजा करतात. बालाघाट न्यूज टाइम्स अनदुर धाराशिव

Post a Comment

0 Comments