Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव : शेख, कुलकर्णी,मिर्झा,अडसूळ, जव्हेरी, काझी , शिंदे यांना कळंब तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

धाराशिव : शेख, कुलकर्णी,मिर्झा,अडसूळ, जव्हेरी, काझी , शिंदे यांना कळंब तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर,  स्नेह सावली  संस्थेला समाज सेवा पुरस्कार जाहीर.....

कळंब : तालुका पत्रकार संघाचे मानाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, या वर्षी सोलापूर येथील पत्रकार आफताब शेख ,बीड येथील अतुल कुलकर्णी, कळंब येथील बालाजी अडसूळ,मुस्तन मिर्झा, धाराशिव येथील गिरीष जव्हेरी  तर समाज सेवा पुरस्कार  बीड येथील  निलेश मोहिते यांच्या स्नेह सावली  फाउंडेशन तर आदर्श शिक्षक पुरस्कार अब्दुल मजीद काझीयाना जाहीर करण्यात आला आहे.तर या वर्षी ज्येष्ठ पत्रकार गणेश अण्णा शिंदे यांचा  गुण गौरव पुरस्कार देवून  विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

पुरस्काराचे हे पंचवीसावे वर्ष आहे. जानेवारीत मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी दिली.

 कळंब तालुका पत्रकार  संघाच्या सदस्यांची  बैठक पत्रकार भवन येथे अशोक शिंदे यांच्या अध्यक्ष ते खाली घेण्यात आली. या वेळी विविध विषयावर चर्चा करण्यात येवून , या वर्षी चे पुरस्कार जाहीर करण्यात आले,या मध्ये..

शि.म.ज्ञानदेव मोहेकर राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार सोलापूर येथील आफताब शेख,

स्वा. शिवशंकर बप्पा घोंगडे पत्रकारिता पुरस्कार - अतुल कुलकर्णी बीड

स्व.गणेश घोगरे ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार - बालाजी अडसूळ कळंब

स्वा. सै.स्व. शकुंतला  देशपांडे समाज सेवा पुरस्कार - निलेश मोहिते यांच्या  स्नेह सावली फाउंडेशन बीड,

रा. ई. काकडे  शोध पत्रकारिता पुरस्कार - मुस्तान मिर्झा कळंब

स्व. सुधाकर सावळे साप्ताहिक पत्रकारिता पुरस्कार - गिरीष जव्हेरी धाराशिव,स्व.के.ए.जोशी आदर्श शिक्षक पुरस्कार अब्दुल माजीद काझी कळंब, यांना पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी जाहीर केले.जानेवारीत होणाऱ्या कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.पत्रकार संघाच्या वतीने सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments