Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुर तालुक्यातील हिप्परगा ताड येथे पवित्र अशा भावार्थ रामायण ग्रंथातील "ब्रह्मपत्र वाचन सोहळा मोठया उत्साहात संपन्न

तुळजापुर तालुक्यातील हिप्परगा ताड येथे पवित्र अशा भावार्थ रामायण ग्रंथातील "ब्रह्मपत्र वाचन सोहळा मोठया उत्साहात संपन्न

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

महाराष्ट्रातील बहुसंख्य रामभक्त वाचक व सुचकांनी यावेळी उपस्थिती दर्शवत वाचन व निरूपण सेवा केली


तुळजापुर :- तुळजापूर तालुक्यातील मौजे हिप्परगा ताड येथे पवित्र अशा एकनाथ लिखित भावार्थ रामायण ग्रंथातील "ब्रह्मपत्र वाचन व निरूपन सोहळा " शनिवार दि.9 डिसेंबर रोजी मोठया उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.शनिवार दि.9 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता ब्रह्मपत्र वाचन व निरूपणांस सुरुवात झाली.भावार्थ रामायण ग्रंथातील सुंदरकांडातील 26 ते 33 असे आठ अध्यायाचे रात्रभर वाचन व निरूपण झाले तब्बल तेरा तास हा सोहळा मोठया भक्तीभावाने व जय श्रीराम च्या जय घोषाने आनंदात पार पडला.यावेळी रामायणाचार्य रामभक्त हभप. वैजनाथ गुट्टे , सौ.दीपालीताई खाटमोडे , काकासाहेब खाटमोडे, श्रीहरी लावंड, बाबुराव शिंदे, शिवाजी महाराज चव्हाण यांच्यासह जवळपास शंभर वाचक व सुचकांनी सेवा बजावली. तुळजापूर, सोलापूर, करमाळा, बार्शी, धाराशिव, अहमदपूर, किनगांव, उमरगा, लातूर, माळशिरस, मोहोळ, पंढरपूर, गंगाखेड आदी भागातून वाचक व सुचक मोठया संख्येने उपस्थित होते.लहान चिमुकली कुमारी सोनम मोरे हिने सुंदर असे वाचन करून उपस्थित रामभक्तांची मने जिंकली. हा ब्रह्मपत्र सोहळा पार पाडण्यासाठी रामभक्त लिंगय्या स्वामी, अरुण दळवे, महेश विभुते,नागनाथ बिराजदार, दिनेश सलगरे , प्रमोद परळकर, दिगंबर पाटील, ज्ञानेश्वर माळी, विनोद ढाले, काशिनाथ पांढरे यांच्यासह रामभक्त ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.रामभक्त नागनाथ बिराजदार यांच्या तर्फे प्रसादाचे वाटप करण्यात आहे.हिप्परगा ताड येथील ग्रामस्थांनी मोठया भक्तीभावांनी ब्रह्मपत्र सोहळा संपन्न केल्याने गाव परिसरातून कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments