Hot Posts

6/recent/ticker-posts

लेक लाडकी योजना : लेक लाडकी योजनेतून वाढणार मुलींचा सन्मान,सरकार मुलींना करणार लखपती|Lake Ladki Yojana: Through the Lake Ladki Yojana, the honor of girls will increase, the government will give lakhs to girls

लेक लाडकी योजना : लेक लाडकी योजनेतून वाढणार मुलींचा सन्मान,सरकार मुलींना करणार लखपती

भंडारा : मुलींचा जन्मदर वाढवणे मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी या सह मुलींचा मृत्यू दर कमी करणे, बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे व शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणणे, यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू केली आहे. पात्र लाभार्थ्यांनी अटी व शर्तीच्या अधीन राहून या योजनेचा लाभ घ्यावा अशी आव्हान जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत करण्यात आली आहे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.

पूर्वीची माझी कन्या भाग्यश्री योजना( सुधारित) ही योजना आता लेक लाडकी योजना म्हणून नव्या स्वरूपात 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींसाठी लागू करण्यात येत आहे. ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये एक एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींसाठी लागू करण्यात आली आहे. ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये एक एप्रिल रोजी किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक किंवा दोन मुलींना लागू राहील. तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.

पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या पत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता-पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असणार आहे. तसेच दुसऱ्या प्रस्तुतीच्या वेळी जुळी आपत्ती जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील, मात्र माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये पेक्षा जास्त नसावे अशा अटी व शर्ती या योजने करता लागू राहतील.

योजनेअंतर्गत देय लाभ

पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये, इयत्ता पहिलीत सहा हजार रुपये, सहावीत सात हजार रुपये, अकरावीत आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये याप्रमाणे एकूण रुपये एक लाख एक हजार एवढी रक्कम देण्यात येईल.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

लाभार्थी मुलीचा जन्माचा दाखला, कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, याबाबत तहसीलदार सक्षम अधिकाऱ्यांचा दाखला आवश्यक राहील. लाभार्थ्याचे आधार कार्ड, पालकांचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुक च्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, रेशन कार्ड मतदान ओळखपत्र संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा शाळेचा दाखला, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र ,अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील.

Post a Comment

0 Comments