शिधापत्रिका होणार इतिहासजमा !ई- शिधापत्रिका देण्याचा शासनाचा निर्णय|
मुबंई : पारंपारिक कागदी शिधापत्रिका ऐवजी ई- शिधापत्रिका देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी सेतू, महा-ई-सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र सरकार केंद्र चालकांना लवकरच या प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे शिधापत्रिका आता इतिहास जमा होण्याच्या अखेरच्या टप्प्यावर आली आहे.
सद्यस्थितीत समाजातील गरीब आणि गरजू नागरिकांना धान्य देण्यासाठी शिधापत्रिका तयार करण्यात आली आहे. एका कुटुंबासाठी एक शिधापत्रिका दिली जात असून कुटुंबातील लहान आणि मोठे व्यक्तींच्या प्रमाणात धान्य दिले जाते. केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने वेगवेगळ्या योजना द्वारे तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत धान्य दिले जाते. अनेक कुटुंबे कामधंदा निमित्त मुळगावी राहत नाहीत त्यांची शिधापत्रिकेवर गावाकडचा पत्ता असल्याने त्यांना धान्य ही गावाकडे स्वस्त धान्य दुकानात मिळते. मात्र हे कुटुंब गावी राहत नसल्याने धान्य घेण्यासाठी त्यांना जाता येत नसल्याने शासनाचा मूळ हेतू साध्य होत नव्हता.
स्वस्त धान्य दुकानदार ही बऱ्याचदा या कुटुंबासाठी आलेल्या धान्याची परस्पर काळाबाजार विक्री करतात. या गैरकर्त्यांना प्रतिबंध करणे आणि गरीब कुटुंबांना धान्य मिळण्यासाठी शिधापत्रिका यांना बारा अंकी क्रमांक देण्यास सुरुवात करण्यात आली. बारा अंकी क्रमांकासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड आणि हाताचे ठसे द्यावे लागतात. पुरवठा विभागाच्या देखरेखी खाली ही प्रक्रिया पार पडली जाते. बारा अंकी क्रमांका नंतर कोणत्याही स्वस्त धान्य दुकानातून हाताच्या बोटाचे ठसे देऊन धान्य घेता येते. गोरगरिबांना सण उत्सव साजरे करण्यासाठी आनंद आनंदाचा शिधा 100 रुपयांमध्ये दिला जातो ज्यांचे रेशन कार्ड ऑनलाइन केलेली आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो.
शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीने सर्व शिधापत्रिका प्रतीक्षा देण्याचे बंद करण्याचा निर्णय घेतला असून आता पुढील काळात ई- शिधापत्रिका दिल्या जाणार आहेत. ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहेत त्यांना ई- शिधापत्रिका करून घेण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. मोबाईल ॲप डाऊनलोड करून या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत तहसील कार्यालयात पुरवठा निरीक्षक आणि तहसीलदार या कागदपत्राची पडताळणी करून ई- शिधापत्रिका मंजूर करणार आहेत. जे नागरिक संगणक साक्षर नाहीत किंवा ज्यांना मोबाईल ॲप मध्ये कागदपत्रे अपलोड करता येणे शक्य नाही अशा नागरिकांना सेतू, महा-ई-सेवा केंद्र, आपले सरकार केंद्रात जाऊन ई- शिधापत्रिकेसाठी कागदपत्रे अपलोड करता येणार आहेत.
गैरप्रकारांना प्रतिबंध
शिधापत्रिका काढून देताना काही दलाल नागरिकांची फसवणूक करतात. आता ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार असल्याने गैरप्रकारांना कोणताही थारा राहणार नाही. ॲपवर कागदपत्रे अपलोड केल्यानंतर त्याची पडताळणी होणार आहे. या ठिकाणी बनावट कागदपत्रे दाखल करता येणार नाहीत. योजनांचा लाभ थेट लाभधारकांना मिळणार आहे.
0 Comments