भारतीय प्रजासत्ताक दिनी शिंगोली सर्कीट हाऊस ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर दरम्यान कलम 144 लागू
धाराशिव,दि 24: 26 जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 74 वा वर्धापन दिन साजरा होणार आहे.या दिवशी विविध पक्ष, संघटना व इतर नागरीकांकडून आपापल्या मागण्यांसाठी मोर्चे,धरणे, उपोषणे,आत्मदहन,रास्ता रोको आदी आंदोलनात्मक कार्यक्रम करण्याची शक्यता आहे.पोलिस अधीक्षक कार्यालय,धाराशिव येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहनाचा कार्यक्रम आयोजित आहे.
तसेच जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव व मध्यवर्ती प्रशासकीय इमारत या ठिकाणीही भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.शिंगोली सर्कीट हाऊस ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,धाराशिव या परिसरात सर्व शासकीय कार्यालये आहेत.या कार्यालयांच्या ठिकाणीही ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित आहेत.याकरीता शिंगोली सर्कीट हाऊस,धाराशिव – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते पोलिस अधीक्षक कार्यालय, धाराशिव या परिसरात 25 जानेवारीचे रात्री 12.00 ते 26 जानेवारी 2024 रोजीचे रात्री 12 वाजतापर्यंत दंड प्रक्रीया संहिता कलम 144 चे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे.
0 Comments