पाच लाखाच्या खंडणीसाठी अपहरण करून वकील दांपत्याचा खून, 24 तासात स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या आरोपींच्या मुसक्या सीसीटीव्हीवरून तपास , राहुरी तालुक्यातील घटना|
अहमदनगर : पाच लाखाच्या खंडणीसाठी आरोपीने वकील दांपत्याचे आधी अपहरण केले व नंतर त्याचा खून करून मृतदेह विहिरीत फेकून दिला. ही धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील उंबरे येथे दिनांक 25 रोजी घडली. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने सूत्रे फिरवून 24 तासाच्या आत मुख्य आरोपी व त्यांच्या तीन साथीदारांना ताब्यात घेतले पाच लाखाची खंडणी न दिल्याने हे कृत्य केल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की राजाराम जयवंत आढाव (वय 52 वर्ष) व मनीषा राजाराम आढाव (वय 42 वर्षे) दोघे राहणार मानोरी तालुका राहुरी हे वकील दांपत्य 25 जानेवारीला त्यांच्या राहत्या घरून राहुरी न्यायालयात गेले. परंतु दुपारनंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही त्यामुळे शंका आल्याने त्यांचे नातेवाईक लता राजेश शिंदे वय 38 वर्षे संगमनेर यांनी राहुरी पोलीस हरवल्याची तक्रार दाखल केली.
वकील दाम्पत्य हरवल्याची घटना घडल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेची निरीक्षक दिनेश आहेर यांना तपासाच्या सूचना दिल्या. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक तुषार धाकराव , पोलीस अंमलदार मनोहर गोसावी ,रवींद्र कर्डिले,गणेश भिंगारदे ,अमृत आढाव ,सागर ससाने, संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे ,सचिन अडवल, भीमराज खरसे,प्रमोद जाधव , रणजीत जाधव, संतोष खैरे ,मेघराज कोल्हे, भाऊसाहेब काळे, संभाजी कोतकर ,चंद्रकांत कुसळकर , अर्जुन बडे यांचे तीन वेगवेगळे पथक तयार करून शोध सुरू केला.
पथकाने मानोरी ते राहुरी मार्गावरील व राहुरी न्यायालया परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच वकील दांपत्याकडे कोणकोणते आरोपींचे वकील पत्र आहे याची माहिती घेतली त्याचवेळी राहुरी न्यायालय परिसरामध्ये तसेच मानवी परिसरामध्ये एक संशयित कार दिवसा व रात्रीचे वेळी गेलेली असल्याचे पोलिसांना आढळले व या कारचा शोध घेत असताना रेकॉर्डवरील आरोपी किरण दुशिंग राहणार राहुरी यांचे वॉरंटबाबतचे प्रकरण आढाव वकील दांपत्याकडे असल्याचे व सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आलेली संशयित कार किरण दुशिंग वापरत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी संशयावरून किरण उर्फ दत्तात्रेय नानाभाऊ दुशिंग वय 32 वर्षे राहणार उंबरे तालुका राहुरी यास ताब्यात घेतले त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी खंडणीसाठी साथीधारासह हा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला व तीन असाचिदाराला अटक केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात भादवी कलम 302 363 201 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे तसेच आरोपी किरण दुशिंग यांच्यासह साथीदार भैया उर्फ सागर साहेबराव खांदे, शुभम संचित महाडिक, हर्षल दत्तात्रय ढोकणे यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली आहे. किरण दुशिंग हा रेकॉर्ड वरील आरोपी असून त्याच्याविरुद्ध संगमनेर राहुरी नाशिक पुणे अशा पोलीस ठाण्यात खून जबरी चोरी घरपोडी खंडणी अशा एकूण बारा गुन्ह्याची नोंद आहे.
दगड बांधून मृतदेह टाकला विहिरीत
वकील दांपत्याचे मृतदेह उंबरे गावातील समस्या भूमी जवळ असलेल्या विहिरीमध्ये दगड बांधून टाकले त्यानंतर वकील दांपत्याची गाडी राहुरी न्यायालय परिसरामध्ये लावली आरोपीने सांगितलेली आहे या हकीकतीवरून खात्री केली असता उंबरे गावांची विहिरीमध्ये वकील दांपत्याचे मृतदेह आढळून आले.
प्लास्टिक पिशवी डोक्यात घालून श्वास रोखला
मुख्य आरोपी किरण दुशिंग व त्याची साथीदार भैया उर्फ सागर साहेबराव शिंदे (राहणार येवले आखाडा तालुका राहुरी), शुभम संचित महाडिक (राहणार गणपती वाडी शाळेजवळ मानोरी), बबन सुशील मोरे राहणार उंबरे तालुका राहुरी यांनी कट करून वकील दांपत्याला कोत केस च्या कामकाजाकरिता बोलावून घेतले त्यानंतर त्यांना किरण दुशिंग यांनी स्वतःच्या गाडीत बसून वकील दांपत्याच्या घरी नेले त्याच्या घरामध्ये दोघांचे हातपाय बांधून पाच लाख रुपये खंडणीची मागणी केली वकील दांपत्याचे त्यांना पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच घरामध्ये पाच ते सहा तास त्यांचा छळ केला त्यानंतर त्यांना त्यांच्याच गाडीमध्ये बसवून मानोरी गावच्या बाहेर नेले रात्रीच्या सुमारास दोघांच्या डोक्यामध्ये प्लास्टिक पिशव्या घालून त्यांचा श्वास गुदमरून खून केला.
गाव बंद ; ग्रामस्थांचे निवेदन
वकील दांपत्याच्या हत्तीच्या घटनेने राहुरी तालुक्यासह संपूर्ण जिल्हा हादरला आहे घटनेच्या निषेधार्थ मानोरी ग्रामस्थांच्या वतीने शोकसभा ठेवण्यात आली होती तसेच संपूर्ण गाव शनिवार दिनांक 27 रोजी दिवसभर बंद ठेवण्यात आले ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला निवेदन दिले सायंकाळी उशिरा वकील दांपत्याचा अंत्यविधी मानूर येथे करण्यात आला.
0 Comments