Hot Posts

6/recent/ticker-posts

स्वराज्य माता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या जंयती दिनानिमित्त विनम्र अभिवादन

स्वराज्य माता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या जंयती दिनानिमित्त विनम्र अभिवादन


स्वराज्य माता जिजाऊ

======================================



स्वराज्य माता होती जिजाऊ 

स्वाभिमानाने मराठी जनता घातली न्हाऊ ॥धृ॥


शिवबाची होती ती माऊली

महाराष्ट्राच्या स्वराज्याची सावली

हिंदवी पताका मातीत रोवली

स्वराज्यासाठी कष्ट अन वेदनांनी तावली ॥१॥


जिजाऊ होती खंबीर काया

जशी मावळ्यावरती प्रेमळ माया

मोगलांची मोगलशाही गेली वाया

मोगल पडले शिवबांच्या पाया ॥२॥


स्वराज्यासाठी जिजाऊंनी चालवली तलवार

अनिष्ट प्रथा ,रुढीवर जिजाऊंनी केला प्रहार

अन्यायाविरुध्द पेटुन उठली ही स्वराज्याची नार

मराठी रक्ताला करायला शिकवला वार ॥३॥


पाठीमागून वार काढणार्‍या हिजड्यांचा काढला काटा

अनिष्ठ चाली रिवाजांना दिला जिजाऊंनी फाटा

शोधल्या जिजाऊंनी हिंदवी स्वराज्यांच्या वाटा

स्वाभिमान अन अस्मितेच्या निर्माण केल्या लाटा ॥४॥


=======================================

श्री.पंकज रा.कासार काटकर

मु.पो.काटी. ता.तुळजापुर

  जि.धाराशिव

  मो.नं.÷९७६४५६१८८१

Post a Comment

0 Comments