धाराशिव शहरात साचलेल्या कचरा व दुर्गंधी बाबत राष्ट्रवादीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोमवार पर्यंत उपाययोजना न झाल्यास कचरा नगरपालिका व लोकप्रतिनिधी च्या घरासमोर टाकण्याचा इशारा
धाराशिव : मागील वर्षापासून धाराशिव शहरातील स्वच्छता , कचरा व नाली सफाई होत नाही तात्काळ उपाययोजना राबविण्यात याव्यात यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे च्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. आ.राहुल मोटे,संजय निंबाळकर, जिल्हाध्यक्ष संजय दुधगावकर, प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
शहरातील मागील वर्षभरापासून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आणि घाणीचे साम्राज्य वाढल्यामुळे शहारातील सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. वेळोवेळी निवेदने देऊनही आंदोलन करुनही त्याची दखल नगर पालिका प्रशासन घेत नाही त्यामूळे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी तर्फे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात व इशारा देण्यात आला की येत्या सोमवार पर्यंत जर शहारातील साफसफाई जर झाली नाही तर जोपर्यंत शहराची साफसफाई केली जात नाही तोपर्यंत शहारातील कचरा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी स्वतः गोळा करून आणून जिल्हाधिकारी कार्यालय समोर, नगर पालिका कार्यालयासमोर तसेच लोकप्रतिनिधी आमदार यांच्या घरासमोर टाकण्यात येईल असा इशारा दिला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव मसूद शेख, युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, युवक प्रदेश सचिव आदित्य पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अयाज (बबलु) शेख, माजी नगरसेवक खलिफा कुरेशी, बाबा मुजावर, बाबा इस्माईल, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष रणवीर इंगळे, तालुका उपाध्यक्ष जयंत देशमुख, अन्वर शेख, लिगल सेल शहराध्यक्ष योगेश सोन्ने पाटील , पंकज भोसले, अँड. अविनाश जाधव, सूरज वडवळे, कुणाल कर्णवर, अभिजीत काळे, अजिंक्य हिबारे, शशिकांत पवार, अभिषेक डोरले, अविष्कार गपाट तसेच इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments