तुळजापुर : वेळामावस्या सणानिमित्त तुळजापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री गजानन घाडगे यांच्या वतीने नागरिकांना आवाहन
तुळजापुर : उद्या दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी वेळामावस्या असल्याने सर्वजण ती साजरी करण्यासाठी आपापले शेतामध्ये जातात, याचाच फायदा घेऊन चोरीसारख्या घटना घडल्या जातात, त्यामुळे सर्वांनी खबरदारी म्हणून आपले मौल्यवान दागिने,वस्तू सांभाळून ठेवाव्यात, तसेच दारे खिडक्या व्यवस्थित लावण्यात याव्यात, किंवा घरातील एखादा सदस्य घराची राखण करण्यासाठी ठेवण्यात यावा, किंवा गावामध्ये गस्त घालण्यात यावी, तसेच ग्रामरक्षक दल सतर्क करावे,पोलीस पाटील सतर्क राहतील असे आवाहान श्री गजानन घाडगे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन तुळजापुर यांच्यावतीने करण्यात येत आहे.
0 Comments