उमरगा लोहारा तालुक्यातील मातंग नवबुद्ध समाजाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्तार दिनामधे शहीद झालेल्या सर्व कार्यकर्त्यांना समाजाच्या वतीने आदरांजली
धाराशिव : समाजातील अडीअडचणी संदर्भात व विधानसभेच्या तयारी संदर्भातील छत्रपती कामगार संघटना लोहारा येथील सभागृहामध्ये बैठक घेऊन, यावेळेस मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांची विधानसभेसाठी तयारी करण्यासाठी चर्चा करण्यात आली. सर्व पक्षातील कार्यकर्त्यांचे मनोगत व्यक्त करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक सुखदेव होलीकर यांनी सूत्रसंचालन करतेवेळी बैठकीचा सविस्तर वृत्तांत वाचून दाखवून समजून सांगितले. यानंतरपुढील अधिकार हमी पक्षाकडे हक्काने मागून घेऊ ,असे ठामपणे सांगितले. आणि बालाजी गायकवाड बहुजन रयत परिषद प्रदेश उपाध्यक्ष यांनी संघटनेच्या माध्यमातून विविध प्रकारे समाजाला न्याय मिळवून देऊन पुढील कार्य समाजाच्या व संघटनेच्या आशीर्वादाने आणखीन जोमाने करीन असे आश्वासन दिले. नंतर तुळशीराम देडे यांनी समाजातील बोलीभाषा बाबत खंत व्यक्त करून पुढील सुधारणा करण्याचे आवाहन केले. केशव सर्वदे होळीकर ग्रामपंचायत सदस्य तथा लोहारा तालुका काँग्रेस पक्षाचे प्रसिद्धीप्रमुख यांनी .मागील कार्यकर्त्याचा अनुभवानुसार आपल्या समाजातील कार्यकर्त्यांना काय मिळाले .याची खंत व्यक्त करून यापुढे पक्षाने आमच्या समाजाला न्याय द्यावा .अशी विनवणी करून पुढील अधिकार हमी पक्षाकडे हक्काने मागून घेऊ ,असे ठामपणे सांगितले. तसेच संजय सर्वदे मागासवर्गीय विभाग काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष यांनी पक्षाच्या माध्यमातून माझ्या समाजाला समाज मंदिर. विधी योजना मिळवून दिल्या असे ठणकावून सांगितले. नंतर छत्रपती कामगार संघटनेचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे मार्गदर्शक आय् तानाजी गायकवाड उर्फ गवळी यांनी सर्व पक्षाच्या विचारधारे बाबत चर्चा करून आपला बहुजन समाज राजकीय दृष्ट्या मागासलेला का आहे. याची खंत व्यक्त करून संशोधन करण्याचे बोलले. कार्यकर्ते सत्ताधारी कसे बनावे याबाबत पर्याय शोधण्यात आला . बहुजन समाजाच्या कल्याणासाठी शासकीय विविध योजना सांगितले. सदर बैठकीचे अध्यक्ष श्री श्रीमंत दुनगे माजी सरपंच यांनी अध्यक्ष भाषण बोलून यावर सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चार मतदान त्यांच्या त्यांच्या पक्षाला करण्याचे ठरवले .एक मतदान तानाजी गायकवाड यांच्या विचारांशी त्यांच्या संघटनेला देण्याचे आव्हान करून सर्वांनी कबूली दिली. तसेच भारतीय जनता पार्टी कडून बहुजन रयत परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री बालाजी गायकवाड यांनी, विधानसभेसाठी तयारी करावी आणि काँग्रेसकडून संजय सर्वदे .शिवसेना ठाकरे गटाकडून अशोक राजे सरवदे यांनी प्रयत्न करावे .ज्यांना राष्ट्रीय पार्टीचे तिकीट मिळेल त्यांच्या पाठीशी संपूर्ण समाज तन-मन धन लावून मतदान करावे असे सर्वांनु मते ठरवण्यात आले. या कार्यक्रमाला आशीर्वाद रुपी मार्गदर्शन म्हणून सुमेत भंतेजी यांनी आशीर्वाद देऊन, फुले शाहू आंबेडकर विचाराच्या उमेदवाराला बौद्ध समाजाच्य कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा डिक्लेअर केलेला . यावेळी सुधाकर बनसोडे जिल्हा उपाध्यक्ष लहुजी शक्ती सेना. फकीरा दलाचे उमरगा तालुका अध्यक्ष संजय कांबळे. सर्जेराव बनसोडे, आर पी आय आठवले गटाचे लोहारा तालुका कार्याध्यक्ष. सिताराम कांबळे लहुजी शक्ती सेना. बालाजी कांबळे.राम कांबळे उमरगा तालुका उपाध्यक्ष लहुजी शक्ती सेना.संभाजी गायकवाड. त्रिवेनाबाई गायकवाड .विनोद गायकवाड. व समाजातील शंभर दीडशे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सर्जेराव बनसोडे यांनी करून कार्यक्रम चांगल्या प्रकारे संपन्न झाला असे सांगितले.
0 Comments