धाराशिव : शेतकर्यांचा सण वेळअमावस्या
====================
आज वेळअमवस्या.धाराशिव,लातुर,नांदेड,सोलापुर,कर्नाटक,या भागात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.वेळ अमवस्या,किंवा वेळअवस या नावाने हा सण साजरा होतो. पालक,मेथी,चुका,चिली,शेपु,वांगे,गाजर,बोर,हरभराभाजी एकत्रित शिजवली जाते.त्यास भज्जीची भाजी असे म्हणतात.बाजरीच्या कडक भाकरी,ज्वारी कडक भाकरी,चपत्या,पुरणाच्या पोळ्या,ताकात मसाला टाकुन केलेला मठ्ठा,अंबिल,गव्हाची खिर,भात,वरण आणि सगळ्यात म्हणजे उंडे हा विशेष बेत असतो.उंडे म्हणजे बाजरी व ज्वारी च्या पिठ्याचे लहान गोल गोट्याच्या आकाराचे गोळे करुन उकडले जाते.या पदार्थांना घेवुन शेतात सर्वजण येतात. शेतात मातीचा कुंभाराकडून घेतलेले मडके त्यास खण किंवा मोरवा म्हणतात.शेतात ज्वारीच्या ताटांना पंचा बांधुन मोरवा ठेवुन पानाचे विडे,हार,पाच दगड मांडून त्याची पुजा केली जाते.पाच दगड म्हणजे पाच पांडव होय.नारळ वाढवुन यथासांग मनोभावे पुजा केली जाते.धान्य पिक चांगले येवु दे म्हणुन प्रार्थना केली जाते.काळ्या आईची ओटी भरली जाते.शिव शिव चांगभले चा उदघोष करत नैवद्याचे अन्न चारी दिशेस फेकुन पंचमहाभुतांना नैवद्य दिला जातो.त्यानंतर सर्व परिवार एकत्रित बसुन जेवण केले जाते.रात्री ज्वारीचे ताटवे शिंदाड्याच्या टोपल्याला लावुन पंचा लावुन दिवा लावुन हर हर महादेव घोषणा देत घरोघरी लक्ष्मी आणली जाते.शेतकर्यांचा हा सण कर्नाटक महाराष्ट्राच्या दक्षिण सिमावर्ती भागात साजरा होतो.
====================
श्री.पंकज रा.कासार काटकर
काटी.ता.तुळजापुर
जि.धाराशिव
मो.नं÷९७६४५६१८८१
0 Comments