चिवरी येथील पाटील विद्यालयात हळदी कुंकू व सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न
चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील दत्तू अण्णा पाटील विद्यालयात बुधवार दि,१७ रोजी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानविकास शिक्षण प्रसारक मंडळ चिवरी या संस्थेच्या अध्यक्षा मनीषा पोपटराव पाटील या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चना राणाजगजितसिंह पाटील , माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे सरपंच शिवकन्या बिराजदार व उपसरपंच निर्मला लबडे तुळजापूर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष विद्याताई गंगणे व तुळजापूर नगरपालिकेच्या नगरसेवीका पुनम अविनाश गंगणे आदी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न करण्यात आला या कार्यक्रमांमध्ये अर्चना राणाजगजीत सिंह पाटील यांच्या हस्ते श्रीरामाची एक मूर्ती व तुळजाभवानी मातेचे एक दिनदर्शिका उपस्थित असलेल्या ४०० महिलांना प्रत्येकी एक प्रमाणे देण्यात आले . या कार्यक्रमात महिलांच्या मनोरंजनासाठी संगीत खुर्ची हा खेळ घेण्यात आला .या खेळात क्रमांक पटकावलेल्या महिलांना अर्चना पाटील यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला .
तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एल के बिराजदार यांना मराठवाडा समन्वय समिती पुणे यांच्या वतीने मराठवाडा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा अर्चना पाटील व अस्मिता कांबळे संस्थेच्या अध्यक्षा मनिषा पाटील, सरपंच शिवकन्या बिराजदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गुणदर्शनाचा कार्यक्रम उत्कृष्टपणे सादर केला . या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख संस्थेचे संस्थापक पोपटरावजी पाटील प्रशांत बिराजदार , तुळजापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक अविनाश गंगणे आदी उपस्थित होते .
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील श्री शिंदे एस एम सर श्री शिंदे एस बी सर श्री मस्के सर श्री सूर्यवंशी सर श्री ठाकूर सर श्री शिंदे बी बी सर यांनी काम केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुरेखा ढगे यांनी केले व उपस्थित गावातील सर्व महिलांचे प्रमुख पाहुण्यांचे आभार श्री मस्के सर यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.
0 Comments