श्री तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास घटस्थापनेने प्रारंभ, राज्यभरातून भाविकांची दर्शनासाठी मोठी मांदियाळी
नमस्कार आपण पाहत आहात बालाघाट न्यूज टाइम्स
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आज 18 जानेवारीपासून घटस्थापनेने प्रारंभ झाला असून तुळजाभवानी देवीची मूळ अष्टभुजा मूर्ती पलंगणावरून सिंहासनावर प्रतिष्ठापीत करण्यात आली. तुळजाभवानी मातेचा हा धाकटा दसरा नवरात्र महोत्सव म्हणून ओळखला जातो, त्यामुळे राज्यभरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. 25 जानेवारी पर्यंत हा उत्सव चालणार असून विविध धार्मिक पूजा, अलंकार पूजा जल यात्रा व विधी होणार आहेत. देवीचे मानकरी यांच्या हस्ते पुजा झाल्यानंतर घटस्थापना करण्यात आली. यावेळी महंत पुजारी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते .बालाघाट न्युज टाइम्स तुळजापुर धाराशिव
0 Comments