धाराशिव : श्रीपतराव भोसलेतर्फे 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' संदेश रॅलीचे आयोजन
धाराशिव : येथील श्रीपतराव भोसले माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, धाराशिव यांच्याकडून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी एक विशेष संदेश रॅली काढण्यात आली. या रॅलीमधून सर्वसामान्य नागरिक, पालक यांना हस्त फलक, घोषणा याब्दारे 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' अभियानाबाबत अवगत करून अभियानात सक्रीयपणे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. या रॅलीसाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. एस. देशमुख सर, उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे सर, उपमुख्याध्यापक श्री. एस. बी. कोळी सर, पर्यवेक्षक श्री. एन. आर. नन्नवरे सर यांचे मार्गदर्शन लाभले. ही रॅली विद्यालयातील शिक्षक श्री. बी. एस. नन्नवरे सर, श्री. के. बी. मोहिते सर, श्री. ए. जे. खुने सर, श्री. शिंदे एल. एस. सर, श्री. एस. आर. जाधव सर, श्री. लोमटे ए. ए. सर, सौ. एस. एल. जाधव मॅडम, सौ. वाडकर मॅडम, सौ. शेळके मॅडम आदींच्या उपस्थितीत पार पाडण्यात आली. या रॅलीसाठी संस्थाध्यक्ष श्री. सुधीर अण्णा पाटील सर व प्रशासकीय अधिकारी श्री. आदित्य पाटील सर यांचे सहकार्य लाभले.
0 Comments