धाराशिव : वडगाव (सि.) येथे कलश मिरवणूकसह रामफेरी उत्साहात
धाराशिव, दि. १९ (प्रतिनिधी) - श्री. क्षेत्र अयोध्या येथे भव्य मंदिर उभारणी पुर्ण झाली असून श्री.रामलल्लाची मुर्ती प्रतिष्ठापना २२ जानेवारी रोजी होणार आहे. या पार्श्वभुमीवर आयोध्येहून आलेल्या अक्षता घरोघरी वाटण्यासाठी तालुक्यातील वडगाव (सि) येथे आज कलश मिरवणूकीसह रामफेरी काढण्यात आली. या वेळी गावातील वातावरण भक्तीमय झाले होते.
तालुक्यातील वडगाव सि. येथे आज कलश मिरवणूक व रामफेरी काढण्यात आली. या वेळी अयोध्येतून आलेल्या अक्षदा व पत्रिका वाटप करण्यात आल्या. या वेळी सर्व क्षेत्रातील गावकरी व महिला भगिनी उपस्थित होत्या. अनेक महिला डोक्यावर मंगल कलश घेऊन या श्रीराम फेरीमध्ये सहभागी झाल्या होत्या. लहान मुलांनी राम, सीता व लक्ष्मण यांची वेशभूषा करून या श्रीराम फेरी सहभागी झाले होते. या श्रीराम फेरीचा प्रारंभ बस स्टॅन्ड पासून होवून पूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून मारुती मंदिराजवळ यांचा समारोप झाला.
या रामफेरीत अंकुश मोरे, जयराम मोरे, कमलाकर कुलकर्णी, बाळासाहेब वाडकर, रोहन मोरे, बालाजी सातपुते, प्रमोद पाटील, विश्वास मोरे, काका म्हेत्रे, आबासाहेब पाटील, महादेव पाटील, शहाजी मोरे यांच्यासह गावातील नागरीक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
0 Comments