Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव: EVM मशीन ऐवजी बॉयलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक विभागास महाराष्ट्र शेतकरी शेतमजूर संघटना मुंबई यांच्यावतीने निवेदन

धाराशिव:  EVM मशीन ऐवजी बॉयलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक विभागास महाराष्ट्र शेतकरी शेतमजूर संघटना मुंबई यांच्यावतीने निवेदन,२४ जानेवारी रोजी धरणे आंदोलन

धाराशिव : महाराष्ट्र शेतकरी शेतमजूर संघटना महाराष्ट्र मुंबई यांच्यावतीने केंद्रीय निवडणूक आयोगास जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले आहे.

संभाव्य राज्याच्या व केंद्रीय निवडणुकीसंदर्भात मतदारांचा EVM मशीनवर संशय निर्माण झालेला असून प्रजासत्ताक गणराज्याची निर्मिती मतांमधून होत नसून केवळ जपानने निर्माण केलेल्या EVM मशीनने होते हि बाब अत्यंत दुर्दैवी आहे. ज्या जपानदेशान EVM मशीनची निर्मिती केली त्या देशात बॉयलेट पेपरचा मतदानासाठी वापर केला जातो. थेटे सादर मशीनचा वापर केला जात नाही. EVM मशीनद्वारे मतांची हेराफेरी केली जाते ती कशी केली जाते हे ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने दिल्लीच्या जंतरमंतर रोडवर प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच या निवडणुकीनंतर मध्यप्रदेश व राजस्थानमधील सुमारे १५ ते २० हजार मतदारांनी EVM मशीनची तक्रार नोंदविली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना त्यात वाट्टेल ते करता येते अशी परिस्थिती असल्याने जपान, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन व अमेरिका या मोठ्या देशातही निवडणुकीसाठी EVM मशीनचा वापर केला जात नाही. तेथे बॉयलेट पेपरवरच मतदान घेतले जाते. असे असताना निर्भय, निर्मळ लोकशाही वाचवण्यासाठी बॉयलेट पेपरवर आगामी निवडणुकीमध्ये मतदान घ्यावे या प्रक्रीयेमुळे जनतेचा लोकशाही वरचा विश्वास वाढेल. तसेच आपले खास लक्ष वेधू इच्छितो कि, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३३४ मध्ये निवडणुकीतील आरक्षण व त्याची मुदत ७० वर्षापर्यंत ठेवलेली होती. ती मुदत दि. २६ जानेवारी २०२२ मध्येच संपुष्टात आलेली आहे. त्यामुळे सदर आरक्षणाची मुदत वाढ दिली किंवा नाही हे पाहूनच निवडणूक घ्यावी. या मागणीसाठी दि. २४/०१/२०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

यावेळी संघटनेचे अध्यक्ष कोंडाप्पा सदाशिव कोरे , कार्याध्यक्ष प्रा. मारुती कारकर, तेजस भालेराव, उमाकांत जमाले, अर्जुन आवाकळे इ.त्यादी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments