Hot Posts

6/recent/ticker-posts

माळशिरस : सेंद्रिय खताच्या साह्याने शिदेवाडी येथील, सुनील जगन्नाथ शिंदे यांनी उसाचे एकरी शंभर टनाचे ध्येय केले पार| Malshiras: With the help of organic manure, Sunil Jagannath Shinde of Shidevadi achieved the target of 100 tonnes of sugarcane per acre

माळशिरस : सेंद्रिय खताच्या साह्याने शिदेवाडी येथील, सुनील जगन्नाथ शिंदे यांनी उसाचे एकरी शंभर टनाचे ध्येय केले पार


नातेपुते- माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी येथील शेतकरी सुनील जगन्नाथ शिंदे यांनी सेंद्रिय खताच्या मदतीनेआधूनिक पध्दतीचा अवलंब  शेती करुन एकरी शंभर टनाचे उत्पन्न घेऊन  सुनील जगन्नाथ शिंदे यांनी शेतकर्यापुढे आदर्श निर्माण केला आहे.शेतीमध्ये  चांगल्या प्रकारे उत्पादन काढतात या आदी मक्याच्या व वांग्याच्या प्लॉटमध्ये भरघोस उत्पन्न घेतलेले आहे, मुलांची व पत्नीची शेतीमध्ये त्यांना भरपूर मदत मिळते, व वडील जी पोलीस पाटील असून त्यांच्या अनूभवाचा फायदा मूलांला होत आहे. सुनील पाटील राजकारण बघत बघत चांगल्या प्रकारे शेती करतात , व त्यामधे त्यांचा कामावरील गडी राजेंद्र सपकाळ यांचे ऊसाला पाणी देण्यासाठी मदत होत असतो. अशाप्रकारे रासायनिक खतासोबत सेंद्रिय खताचा वापर करून त्यामध्ये त्यांनी सिलिकॉनचा जास्त प्रमाणात वापर केला आहे. त्यांनी दाखवून दिले की सेंद्रिय खतांनी सुद्धा एकरी शंभर टन उत्पन्न निघु शकते ,त्यांनी आपल्या ऊसाला चार डोस केले आहे. भेसळ डोज ,चडी,थाप आणि बांधणी, दिले आहे .दोन वेळा  पाण्या द्वारे  खते सोडलेले आहे , व उसाला दोन फवारण्या केलेल्या आहेत .जवळपास ४३ते ४८कांड्यावर ऊस गेलेला आहे. त्यांचा एकूण पाच एकर ऊस असुन एकरी खताचा खर्च 25हजर ते28हजार इतका झाला आहे. असे सुनील पाटील यांनी सांगितले आहे व ते सेंद्रिय खते वापरून व योग्य सल्ल्याने अतिशय समाधानी आहे व लोकांना वापरण्यास सांगत आहे व सल्ला घेण्यास सांगत आहे. त्यांच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे ,शेतीचे योग्य पद्धतीने नियोजन केले व योग्य मार्गदर्शन लाभले आणि ते मार्गदर्शन आपण शंभर टक्के ऐकले तर तर निश्चितपणे शेती परवडू शकते हे त्यांनी स्वतःच्या कृतीतून दाखवून दिले. १००टन उत्पन्न निघण्यासाठी त्यांनी ८६०३२ उसाची निवड केली , एकदा उसाची पाचट काढली,15दिवसातून एकदा मोकळे  भिजवले व सांगितलेले मार्गदर्शन योग्य पद्धतीने हाताळले अशा पद्धतीने शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवून एकरी शंभर टनाचे उत्पन्न पार केले, याकामी त्यांना गौतम मिश्रा यांचे सहकार्य मिळाले.

Post a Comment

0 Comments