Hot Posts

6/recent/ticker-posts

संजय नागरे यांची साॅफ्ट टेनिस च्या राष्ट्रीय प्रशिक्षक पदी निवड|Sanjay Nagre selected as National Coach of Soft Tennis

संजय नागरे यांची साॅफ्ट टेनिस च्या राष्ट्रीय प्रशिक्षक पदी निवड


तुळजापुर :संजय नागरे यांची शालेय साॅफ्ट टेनिस महाराष्ट्र संघाच्या राष्ट्रीय प्रशिक्षक पदी निवड झाली आहे. राष्ट्रीय स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबीर व राष्ट्रीय स्पर्धेसाठी संजय नागरे यांची प्रशिक्षक पदी निवड करण्यात आली आहे.   महाराष्ट्र राज्याचा क्रिडा व युवक सेवा संचालनालयाचा वतीने संजय नागरे यांचा निवडीची घोषणा करण्यात आली आहे. 

   भारतीय शालेय खेल महासंघ पुरस्कृत राष्ट्रीय शालेय साॅफ्ट टेनिस स्पर्धा १९ ते २२ जानेवारी या कालावधीत रायपूर - छत्तीसगड येथे घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या खेळांडूचे राष्ट्रीय स्पर्धे पूर्वीचे प्रशिक्षण शिबीर १६ ते १८ जानेवारी या कालावधीत गोंदिया येथे ठेवण्यात आले आहे. 

  स्पर्धा पूर्व प्रशिक्षण व राष्ट्रीय शालेय साॅफ्ट टेनिस स्पर्धेसाठी संजय नागरे यांची १७ वर्षे वयोगट मुलांचा संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. 

     संजय नागरे यांचा निवडीचे महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस संघटनेचे अध्यक्ष सुनिल पूर्णपात्रे, सचिव रविंद्र सोनवणे, जिल्हाध्यक्ष संदीप गंगणे, जिल्हासचिव शिराज शेख, किरण हंगरगेकर, प्रदिप अमृतराव, करण खंडागळे, यश हुंडेकरी, प्रियंका हंगरगेकर आदींनी अभिनंदन केले आहे.



Post a Comment

0 Comments