ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात एकास अटकपूर्व जामीन मंजूर
धाराशिव : वाशी पोलीस ठाणे अंतर्गत दाखल ॲट्रॉसिटी गुन्ह्यात अमित पांडुरंग कवडे यांना छत्रपती संभाजी नगर उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्याची माहिती विधीज्ञ श्रीकांत कवडे यांनी दिली या प्रकरणातील फिर्यादी हे दूध उत्पादन करतात तर अमित कवडे हे दूध खरेदी व खवा विक्रीचा व्यवसाय करतात. फिर्यादी यांनी कवडे यांच्याकडून दूध विक्री करण्याच्या बोलीवर रोख रक्कम उसनेवारीने घेतली होती हिशोबातील उर्वरित रक्कम कवडे यांनी फिर्यादीकडे मागितल्यावर फिर्यादी यांनी कवडे यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी व इतर कलमाने गुन्हा नोंद केला होता न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीनचा अर्ज फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात अर्ज केला होता तेथे विधीने श्रीकांत कवडे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून कवडे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
0 Comments