चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीची चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक दि, २१ रोजी बिनविरोध पार पडली. यामध्ये सोसायटीच्या चेअरमनपदी सलग दुसऱ्यांदा बालाजी शिंदे यांची बिनविरोध निवड झाली तर व्हाईस चेअरमनपदी मोतीराम चिमणे यांची बिनविरोध निवड झाली, येथील विविध विकास कार्यकारी सोसायटीची निवडणूक दि, २८ जानेवारी रोजी पार पडली होती. यामध्ये शेतकरी विकास पॅनेलचे सर्व १३ उमेदवार विजयी झाले होते..दि,२१ फेब्रु.रोजी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणुक निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये चेअरमनपदि बालाजी मोतीराम शिंदे, व्हाईस चेअरमनपदी मोतीराम सिद्राम चिमणे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीच्या वेळी विविध विकास कार्यकारी सोसायटीचे सदस्य शाहूराज इंगळे, दत्तात्रय पाटिल, शिवाजी येवते, सुभाष जाधव,. नागनाथ शिंदे, ज्ञानदेव मूळे,विष्णु परीट, गोराबा कोरे, शांताबाई आरगे, कुसुमबाई झांबरे ,वनिता शिंदे आदी सर्व संचालक उपस्थित होते. यामध्ये निवडणुक अधिकारी म्हणुन सुदर्शन शिंदे ,सचिव राजकुमार माळगे यांनी काम पाहिले.
0 Comments