Hot Posts

6/recent/ticker-posts

सासूचा खून करणाऱ्या जावयास जन्मठेप ,जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल|Life imprisonment for son-in-law who killed mother-in-law, District and Sessions Court verdict

सासूचा खून करणाऱ्या जावयास जन्मठेप ,जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल|


जालना प्रतिनिधी: आंघोळीला गरम पाणी टाकण्याच्या कारणावरून पत्नीवर कोयतेने जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये आलेल्या सासू वरही त्यांनी हल्ला चढविला यात सासू ठार झाली या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर यम जयस्वाल यांनी आरोपी संतोष भीमराव सरोदे वय 38 राहणार रामनगर तालुका जालना या आरोपीस दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्षाचा सक्षम कारावास व कलम 307 भारतीय दंड संहिता मध्ये पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दहा वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक वर्षे सश्रम करावासाची शिक्षा ठोठावली आहे.

दिनांक 1 एप्रिल 2021 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास फिर्यादी कविता संतोष सरोदे, ही तिची आई रेशीम मोकिंदा कोळी हिच्या घरी असताना अंघोळीला गरम पाणी टाकण्याच्या कारणावरून वाद झाल्याने आरोपी संतोष यांनी कोणत्याही पत्नी कविता हिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला व कविताची आई मयत रेशम हिला जीवे ठार मारले. या प्रकरणी कविता हिच्या फिर्यादीवरून परतुर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 302 360 504 कलमाने गुन्हा दाखल केला तपास झाल्यानंतर न्यायालयात दोषारुपत्र  दाखल करण्यात आले. सरकार पक्षातर्फे सदर प्रकरणात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी कविता प्रत्यक्षदर्शी पंच साक्षीदार वैद्यकीय अधिकारी इतर साक्षीदार तसेच तत्कालीन तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकार पक्षातर्फे आलेला साक्षी पुरावा व दोन्ही बाजूंना युक्तिवाद लक्षात घेऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश - किशोर एम जयस्वाल यांनी आरोपी संतोष भीमराव सरोदे यास दोषी ठरवून वरील प्रमाणे शिक्षा ठोठावली आहे या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोग्यतऍडव्होकेट जयश्री बी सोळंके बोराडे यांनी काम पाहिले व कोर्ट भैरवी जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील कर्मचारी यांनी मदत केली.

Post a Comment

0 Comments