तुळजापूर बस स्थानकात चोरीचे सत्र सुरूच, बस मध्ये चढताना सोन्याची चैन पळवली|
धाराशिव : तुळजापूर बस स्थानकात गेल्या काही दिवसापासून चोरट्याने धुमाकूळ घातला असून चक्क बसमध्ये महिला चढत असताना महिलांच्या गळ्यातील दागिने व पर्स चोरीचे प्रमाण वाढत चालले असून याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवाशातून होत आहे. तर शनिवार दिनांक 2 मार्च रोजी तुळजापूर उमरगा बस मध्ये चढत असताना चक्का पुरुषाच्या गळ्यातील चैन लंपास केल्याची घटना घडली आहे.
बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने पुरुष प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची चैन पळवल्याची घटना तुळजापूर बस स्थानकात घडली याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तुळजापूर बस स्थानकात मागील काही दिवसापासून भुरट्या चोरट्यांचा लुटालुटीच्या वाढत्या घटनेमुळे प्रवाशात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी चोरट्यांचा मुस्क्या आवळाव्यात अशी मागणी प्रवाशातून व नागरिकातून होत आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की फिर्यादी रमेश माधवराव इंगळे वय 57 वर्षे राहणार ओमकार नगर उमरगा हंगामी मुक्काम धाराशिव शनिवारी दिनांक दोन रोजी तुळजापूर बस स्थानक येथे गेले होते. बस येताच ते उमरगाकडे जाणाऱ्या बस मध्ये चढले यावेळी गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने इंगळे यांच्या गळ्यातील 25 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन लंपास केली. या चेन ची किंमत अंदाजे 85 हजार रुपये होती ही चोरीची घटना निदर्शनात येतात इंगळे यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी फिर्यादी दिली आहे त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments