तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक १४ रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भाषणे केली. यावेळी विकास कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन मोतीराम चिमणे, सुभाष चिमणे, राम वाघमारे, धनराज मिटकरी ,कैलास गायकवाड़ , प्रवीण गायकवाड,किसन भोवळ,बिभिषन मिटकरी अंगणवाडी सेविका अनिता बिराजदार ,लक्ष्मी मेंढापुरे, कल्पना शिंदे, शालेय समिती अध्यक्ष शत्रुघ्न बिराजदार मुख्याध्यापक राहुल मसलेकर,सहशिक्षक अण्णासाहेब भोंग, मोहन राजगुरू , सहशिक्षक सोनटक्के, आदीसह भीमसैनिक ग्रामस्थ,तरूण विद्यार्थी उपस्थित होत.
0 Comments