Hot Posts

6/recent/ticker-posts

दुचाकीची स्कुटीला धडक, विद्यार्थिनी ठार, एक गंभीर जखमी|Two-wheeler collides with scooty, student killed, one seriously injured

दुचाकीची स्कुटीला धडक, विद्यार्थिनी ठार, एक गंभीर जखमी|


बुलढाणा : शिकवणी वर्गाला जात असताना भरधाव वेगातील दुचाकीने स्कुटीला दिलेल्या धडकेने एक विद्यार्थिनी मृत्युमुखी पडली तर दुसरी गंभीर जखमी झाली आहे. शेगाव शहरातील अकोड रोडवरील उड्डाण पुलाजवळ टी पॉइंट जवळ 15 एप्रिल रोजी सायंकाळी हा अपघात घडला आहे.

हाय फाय कॉलनीतील रहिवाशी भारती सुनील दामोदर वय 19 ही सोमवारी सायंकाळी मैत्रीण साक्षी विलास माळी हिला घेऊन एक्टिवा स्कुटी (क्रमांक MH 30 BS-4238) ही शिकवणी वर्गाला जात होती, दरम्यान उड्डाणपुलाजवळ टी पॉइंट जवळ युनिकॉर्न क्रमांक एम एच-बीएस-३४६८)ने स्कुटीला जोराची धडक दिली या दुर्घटनेत भारती दामोदरचा जागीच मृत्यू झाला आहे. तर साक्षी माळी ही गंभीर जखमी झाली तिचे दोन्ही पाय मोडले असून तिच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृत भारतीचे वडील सुनील दामोदर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात दुचाकी स्वराविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 304 अ 279 377 अन्वे गुन्हा दाखल केली आहे या घटनेने शेगाव शहर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments