Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील प्राथमिक शाळा येथे शालेय पुर्वतयारी मेळावा उत्साहात संपन्न

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील प्राथमिक शाळा  येथे शालेय पुर्वतयारी मेळावा उत्साहात संपन्न

=============================



तुळजापुर / प्रतिनिधी दि. १९÷जि.प.प्राथमिक शाळा काटी ता.तुळजापुर येथे जुन मध्ये इयत्ता पहिलीत येणार्‍या चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पुर्वतयारी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.नवागतांचे फुल देऊन ,विविध खेळ घेऊन स्वागत करण्यात आले.

 नविन प्रवेश घेणार्‍या चिमुकल्यांची नावनोंदणी करुन,वय ,वजन,उंची मोजली गेली.त्यांचा शारिरीक ,भावनिक,सामाजिक विकासाठी विविध खेळ ,उपक्रम,प्रश्नावली ठेवण्यात आली होती.भाषीक,बौध्दीक,सामाजिक,भावनिक,शारारिक, मनोरंजन पर खेळ घेण्यात आले.

शालेय पुर्वतयारी मेळावा यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री.रसाळ सत्यवान,सहशिक्षक  श्री.पंकज कासार काटकर, श्री.अजित इंगळे ,श्रीमती दैवशाला कांबळे ,श्रीमती शितल चोपडे विशेष प्रयत्न केले.पसायदानाने मेळाव्याची सांगता झाली.










Post a Comment

0 Comments