अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नी व प्रियकराचा खून
मंद्रूप परिसरात खळबळ संशयित फरार|
सोलापूर : पत्नी बरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने पत्नी सहतीच्या प्रियकराचा कुऱ्हाडीने मारून खून केल्याची खळबळ जनक घटना बुधवारी दिनांक 10 रोजी दुपारी बरुड तालुका दक्षिण सोलापूर येथील सलगरे वस्ती येथे घडली आह. या घटनेतील संशयित आरोपी असलेला पती फरार झाला आहे
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की बरोबर आणि नांदणीच्या सीमेवर शिवारात सलगरे वस्ती आहे या वस्ती परिसरात राहणाऱ्या एका महिलेबरोबर वय 29 राहणार वरुर येथील नांदणीच्या नरोटे वस्ती येथे राहणाऱ्या एका इसमाचे वय 22 राहणार नरोटे वस्ती नांदणी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून महिलेच्या पतीने पत्नी व तिचा संशयित प्रियकर यांचा खून केला असून या घटनेतील मृत तरुण अविवाहित होता. या दोघांमध्ये गेल्या काही दिवसापासून अनैतिक संबंध असल्याची कुणकुण मृत महिलेच्या पतीला लागली होती दरम्यान या दोघांनी समजावून सांगण्यात आले होते तरी पण या दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू असल्याच्या संशयावरून सदर पतीने पत्नीला काही दिवस माहेरी सोडली होती अशी चर्चा गावात सुरू होती यानंतर काही दिवसांनी बाहेरकडील मंडळींनी दोघांनाही समजावून सांगून तिला पतीकडे आणून सोडले होते. मात्र परत त्यांच्यातील संबंध तसेच कायम राहिल्याचा राग पतीला होता म्हणून बुधवार दिनांक दहा रोजी दुपारी महिलेच्या पतीने दोघांच्या शरीरावर कुराडीने गळ्यावर मानेवर आणि शरीराच्या अन्य भागावर मारून गंभीर स्वरूपात जखमी करून दोघांना जीवे ठार मारले.
ही घटना बुधवार दिनांक 10 रोजी दुपारी घडल्याची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत फुले, सहाय्यक फौजदार संदीप काशीद, सागर चव्हाण यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. आणि विना विलंब तपास सुरू केला. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांनी देखील भेट देऊन पाहणी केली या गंभीर घटनेचा रात्री उशिरापर्यंत मंद्रूप पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
0 Comments