तुळजापूर तालुक्यामध्ये शेतीच्या खरीपपूर्व कामांना वेग बैलजोडी ऐवजी ट्रॅक्टरद्वारे मशागती कडे शेतकऱ्यांचा वाढता कल
तुळजापूर : यावर्षी पाऊस वेळेवर व भरपूर प्रमाणात होण्याची संकेत हवामान खात्याने दिल्याने तुळजापूर तालुक्यात सर्वत्र खरी पूर्वस्थिती कामांना वेग आला आहे रखरखत्या उन्हातही शेतकऱ्यांनी खरिपाच्या तोंडावर शेती मशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे यामध्ये शेतातील पालापाचोळा वेचणे बांधबंधिस्त करणे जमिनीची नांगरट खुरपणी करणे रोटर मारणे नैसर्गिक खताचा मात्रा देणे आधी कामे तो उरकून घेत आहे खरीप हंगामासाठी कृषी कर्जाचे वितरण लवकर करावी बी बियाणीवर रासायनिक खते वाजवी दरात उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ही शेतकरी वर्गातून केली जात आहे.
तुळजापूर तालुक्यात गतवर्षी पावसाविना खरीप हंगाम पूर्णता वाया गेला तर रब्बी हंगाम अवकाळी पावसावर कसाबसात धरला त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे चालू वर्षी तरी खरीप हंगाम हंगामात विसर्ग साथ देईल आणि शेतीतून काहीतरी येईल या आशेने त्यांनी शेती मशागत करण्याच्या कामांना वेग सुरुवात केली आहे. मागील दहा वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक शेतकरी आपल्या शेतीची मशागत करायची मात्र यांत्रिकीकरणाच्या युगात शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक यंत्राकडे वळले. बैल जोडी च वाढलेले दर चारा प्रश्न यामुळे शेतकऱ्याला बैल जोडी सांभाळणे शेतकऱ्यांना जिकरीचे झाले आहे.
यापेक्षा ट्रॅक्टर द्वारी मशागतिकडे कल वाढला आहे परिसरातील सर्वच विंधन विहिरी व तलावांनी अगदी तळ गाठला असून खरीप आणि रब्बी हंगामा शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळीराजा कर्जाच्या घाईत लोटला गेला आहे. मात्र तरीदेखील यंदा नवीन जोमाने व आशेने तो कामाला लागला आहे.
सध्या उन्हाळ्याच्या एप्रिल महिना संपत आहे जून महिन्यातच पावसाला सुरुवात होईल असा अंदाज हवामान खात्याने वरती विला आहे त्यामुळे खरिपाच्या सर्व मशागतीची कामे पूर्ण करण्यासाठीची बळीराजाची धडपड सुरू झाल्याचे चित्र परिसरात दिसत आहे. बालाघाट न्यूज टाइम्स साठी संपादक राजगुरू साखरे तुळजापूर धाराशिव
0 Comments