धाराशिव: श्रीपतराव भोसलेमार्फत 'स्वीप' अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी पथनाट्य सादर
धाराशिव: सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. जास्तीत जास्त मतदान व्हावे व मतदानाची टक्केवारी वाढावी या हेतूने शासन स्तरावर मतदान जनजागृती साठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून धाराशिव येथील श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयामार्फत 'स्वीप' अंतर्गत मतदान जनजागृती साठी पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्यातून मतदार नोंदणी पासून ते मतदान करण्यापर्यंत काय काय करावे यासंदर्भात जागृती करण्यात आली. वय वर्षे १८ पूर्ण झालेल्या व नोंदणी केलेल्या सर्व मतदारांनी मतदान करावे, मतदानाला जात असताना सोबत ईपिक कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग परवाना इत्यादीपैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा घेऊन जाण्याचा संदेश या पथनाट्यातून देण्यात आला. तसेच कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपल्या सद्सतविवेकबुद्धीने मतदान करावे असाही संदेश देण्यात आला. हे पथनाट्य राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सादर करण्यात आले.
या पथनाट्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी श्री. पाटील एस. व्ही. सर, सहकार्यक्रमाधिकारी श्री. मोहिते के. बी. सर यांनी विशेष परिश्रम घेतले. या पथनाट्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री. नन्नवरे एन. आर. सर, उपप्राचार्य श्री. घार्गे एस. के. सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थाध्यक्ष सुधीर अण्णा पाटील सर, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील सर, श्री. देशमुख एस. एस. सर यांचे सहकार्य लाभले.
0 Comments