खासदार ओमराजे यांची भव्य रॅलीने उमेदवारी दाखल, महाविकास आघाडीचे तगडे शक्ती प्रदर्शन|
धाराशिव : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी मंगळवार दि, 16 रोजी धाराशिव येथे भव्य रॅली काढून तगडे शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते धाराशिव शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर ग्रामदैवत धारासुरमर्दिनी देवी व हजरत ख्वाजा समशुद्दीन काजी दर्गाह यांची आशीर्वाद घेऊन काळा मारुती चौक पोस्ट ऑफिस संत गाडगे महाराज चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महापुरुषांना अभिवादन करून रॅली जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली.
यावेळी माजी मंत्री तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, काँग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुख, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) युवा नेते आमदार रोहित पवार. महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओम राजे निंबाळकर शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील माजी आमदार राहुल मोटे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील माजी आमदार दयानंद गायकवाड शिवसेना संपर्कप्रमुख शंकरराव बोरकर, सहसंपर्कप्रमुख मकरंद राजे निंबाळकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, सय्यद खलील माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील ,राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर प्रतापसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, मसूद शेख माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीश सोमानी महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामल वडणे सोमनाथ गुरव प्रवीण कोकाटे, रवी कोरे यांच्यासह उस्मानाबाद मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रिपाई आणि मित्र पक्षाची पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments