हवामान ब्रेकिंग : 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याचा अंदाज
नमस्कार आपण पाहत आहात बालाघाट न्यूज टाइम्स
राज्यात पाणीटंचाई सोबतच तीव्र उन्हाळ्याने त्रस्त नागरिकांसाठी दिलासादायक अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तुला आहे मान्सून येत्या 31 मे रोजी कमी अधिक चार दिवस केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख 1 जून असून यंदा मान्सून एक दिवस आधीच देशाच्या मुख्य भूभागावरील प्रवास करू शकतो
विषुववृत्त ओलांडून भारतीय उपखंडाच्या दिशेने नैऋत्येकडून वाहणाऱ्या मोसमी वाऱ्यांना प्रवाह सध्या सक्रिय होऊ लागला आहे पुढील चार दिवसात म्हणजे 19 मे पर्यंत मान्सून दक्षिण अंदमानचा समुद्र आग्नेय बंगालचा उपसागर आणि निकोबार बेटावर दाखल होऊ शकतो असे आयएमडीने म्हटले आहे. सर्वसाधारणपणे 22 मे ला मान्सून अंदमान दाखल होत असतो त्यानंतर ही मान्सूनसाठी हवामान अनुकूल राहण्याची चिन्हे दिसत असून सर्वसाधारण तारखेच्या एक दिवस आधी म्हणजे 31 मे रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन होऊ शकते. असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे बालाघाट न्यूज टाईम साठी पुणे महाराष्ट्र
0 Comments