Hot Posts

6/recent/ticker-posts

राजकीय : उस्मानाबाद -धाराशिव लोकसभेतील मतांची गोळाबेरीज जुळविणे सुरु, कोण होणार धाराशिवचा खासदार, पारावर गप्पा रंगू लागल्या

राजकीय : उस्मानाबाद -धाराशिव लोकसभेतील मतांची गोळाबेरीज जुळविणे सुरु, कोण होणार धाराशिवचा खासदार, पारावर गप्पा रंगू लागल्या

 

धाराशिव : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ निवडणूक सात मे रोजी पार पडली असूननिवडणुकीच्या निकाल लागण्याला आणखी 20 दिवसाचा कालावधी उरला आहे त्या दिवसाचे काउंट डाऊन मतदारसह आता राजकीय पक्षांमध्ये सुरू आहे. या मतदारसंघात कोणाला कौल मिळेल कोणत्या समाजाची मते अधिक कुणाला फटका बसेल अशी गणिते आता जुळवणे सुरू झाले आहे. गल्लोगल्ली केवळ राजकीय चर्चा सुरू झाले आहेत कोण कोठे अधिक प्रभावी ठरली याचाही अंदाज राजकीय पुढारी घेताना दिसत आहेत यावेळी निवडणुकीत शहरासह ग्रामीण भागात राजकीय नेत्याचा एकत्रित पणा व एक संघटित राहून केलेल्या एकत्रित नियोजन तसेच प्रचार आणि निष्ठावंताची फळी हे वैशिष्ट्ये दिसून आल्याची ही जोरात चर्चे आहे.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत 31 उमेदवारांनी निवडणूक रिंगणात होते त्या त्या उमेदवारांनी आपल्या परीने प्रचाराची धुरा खांद्यावर घेऊन लोकसभेच्या निवडणुकीत नेटाने काम केले राज्यात शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये निर्माण झालेल्या फाटा फुटी नंतर जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी निष्ठावंत ची फळी खरोखरच चांगली काम करणारी ठरली. पक्षाच्या फुटी नंतर मतदार संघातही जुनी फळी समोर आल्याचे दिसून आले राष्ट्रवादी सहस शरद पवार गट व शिवसेना ठाकरे गटाचे जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्ष  सक्रिय झाल्याचे या निवडणुकीत दिसून आले. त्यामुळे आता चार जून रोजी जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालाच्या दिवसाची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे निवडणूक निकाल वीस दिवस बाकी राहिला असून बेरीज वजाबाकीची गणिते जुळवली जात आहेत नाही राजकीय पक्षाकडून देखील मतदानाचा अंदाज घेतल्या जात आहे याशिवाय कोण कोठे सरस होते याचीही चर्चा गलोबल्लीतील चर्चेतून रंगत आहे सोबतच लोकसभेच्या निवडणुकीत निवडणूक निकाल लागल्यानंतर आगामी विधानसभेच्या वजाबाकीचा व बेरजेचा हिशोब देखील आत्तापासूनच केल्या जात असल्याचे चित्र परिसरात पहावयास मिळत आहे या निवडणूक निकालात मतदार संघात कोणता विधानसभा मतदारसंघ हा उमेदवाराला मताधिक्य देण्यात पुढे राहील यावर विधानसभा मतदारसंघाचे गणित अवलंबून राहणार आहे तेव्हा मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालातच विधानसभेच्या गणिताचे सूत्र सापडणार आहे पक्षश्रेष्ठी देखील मताधिक्याचे गणित लावून उमेदवारी जाहीर करतील असेही चित्र आहे.

Post a Comment

0 Comments