Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव : श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उज्वल निकालाची परंपरा कायम

धाराशिव : श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयाच्या उज्वल निकालाची परंपरा कायम


धाराशिव :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत श्रीतपराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने लातूर विभागात आपल्या दैदिप्यमान यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातील 12 वी बोर्ड परीक्षेसाठी सर्वाधिक विद्यार्थी संख्या असूनही उल्लेखनीय यश विद्यालयाने मिळविले आहे. विज्ञान शाखेतून एकूण 864 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती, त्यापैकी 849 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील 241 विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले आहेत. 

या शाखेचा सरासरी निकाल 98.26% एवढा आहे. विज्ञान शाखेमधून प्रथम क्रमांक दिरगुळे प्रथमेश सिताराम शेकड़ा 543 गुण 92.50% व्दितीय कु.पवार स्नेहल विजय 541 गुण 91.00% तसेच तृतीय क्रमाक कु.सांळुके ऋतुजा जयवंत 540 गुण 90.00% प्राप्त केले. विद्यालयाच्या कला शाखेतुन 248 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी 199 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. त्यातील 12 विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले आहेत. या शाखेचा सरासरी निकाल 79.83% एवढा आहे. कला शाखेमधुन प्रथम क्रमांक कु.आहेर कोमल बाळासाहेब 554 गुण 92.33%, व्दितीय कु. शिंदे निकिता बाळासाहेब 536 गुण 89.33%, तृतीय कु.तांबारे अमृता किरण 527 गुण 87.83% आहे. तसेच वाणिज्य शाखेतून 119 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी 116 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील 20 विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेचा सरासरी निकाल 97.47% एवढा आहे. वाणिज्य शाखेमधुन प्रथम क्रमांक तांबे रामदास लक्ष्मण  552 गुण 92.00%, व्दितीय क्रमांकाचे दोन विद्यार्थी , कु.रोटे वैष्णवी महादेव 535, गुण 89.17%, व लांडे रोहित ईश्वर 535, गुण 89.17% व तृतीय क्रमांक कु.मोरे किर्ती प्रकाश 532 गुण 88.67% आहेत.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री.सुधीर (आण्णा) पाटील सर, सरचिटणीस सौ. प्रेमाताई सुधीर पाटील मॅडम, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकिय अधिकारी श्री. आदित्य पाटील सर, विद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी श्री. एस. एस. देशमुख सर, प्राचार्य श्री. नन्नवरे एन. आर. सर,  उपप्राचार्य श्री. घार्गे एस. के. सर, पर्यवेक्षक श्री. शिंदे एम.व्ही. सर, फोटॉन बॅचचे प्रमुख श्री. भगत सर, फेनॉमेनाल बॅचचे प्रमुख श्री. पाटील जे.एस. सर तसेच सर्व प्राध्यापक, विषयप्रमुख, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments