निकालापूर्वीच खासदार ओमराजे निंबाळकर यांचे धाराशिव शहरात विजयाचे बॅनर झळकले, एक्झिट पोल व कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास
धाराशिव : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या विजयाचे निकालापूर्वीच धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅनर झळकावून कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला आहे. एक्झिट पोल व कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास यावेळी पाहायला मिळाला.
देशभरात लोकसभेचा रणसंग्राम संपला आहे, मंगळवारी दिनांक चार रोजी या रणसंग्रामाचा निकाल जाहीर होणार आहे. त्याच अनुषंगाने उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत तथा विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या च्या अर्चनाताई पाटील यांच्यामध्ये सरळ लढत झाली. या नात्याने दिर भावजय यांच्यात झालेल्या लढतीकडे अवघ्या राज्याची लक्ष लागले आहे. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना विजय आपलाच होईल असा ठाम विश्वास आहे.
देशभरात मतदानाचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर विविध माध्यमातून एक्झिट पोल स्पष्ट होऊ लागली आहेत. यावेळी जवळपास सर्वच एक्झिट पोल मध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील जागा महाविकास आघाडीकडे दाखवली जात असल्याने कार्यकर्त्यांना विजय निश्चित वाटू लागला आहे. याच विश्वासाने खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विजयाचे बॅनर निकालापूर्वीच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्याकडून लावून पेढे वाटले आहेत. निकालापूर्वीचा हा कार्यकर्त्यांचा उत्साह आनंदाने भारावून गेला आहे.
0 Comments