Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव: उत्सुकता शिगेला उद्या फैसला , उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज,उद्या ठरणार धाराशिवचा खासदार| Eagerness has reached the decision tomorrow, the district administration is ready for the counting of votes of Osmanabad Lok Sabha constituency, the MP of Dharashiv will be tomorrow

उत्सुकता शिगेला उद्या फैसला , उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज,उद्या ठरणार धाराशिवचा खासदार| 




धाराशिव : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी उद्या ४ जून रोजी शासकीय तंत्रनिकेतन धाराशिव येथे सकाळी ८ वाजता पासून सुरु होणार असून मतमोजणीची तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिनांक ३१ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक गोहर हसन उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव उप जिल्हाधिकारी उदयसिंह भोसले व उप जिल्हाधिकारी श्री राऊत यांचे प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे यावेळी म्हणाले की , शासकीय तंत्रनिकेतन येथील स्ट्रॉंग रूममध्ये अर्थात सुरक्षा कक्षा ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले असून या स्ट्रॉंग रूमचे सील सकाळी साडेसहा वाजता उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येणार आहे. टपाली मतपत्रिका ह्या कोषागार कार्यालयातील स्ट्रॉंग रूम येथे ठेवण्यात आले असून चार जून रोजी सकाळी सहा वाजता या टपाली मतपत्रिका शासकीय तंत्रनिकेतन येथील मतमोजणी केंद्रावर घेऊन जाण्यात येणार आहेत .३९७९ दिव्यांग मतदार आणि ८५ वर्षावरील जेष्ठ नागरिक भारतीय सैन्यात कर्तव्यावर असलेल्या जिल्ह्यातील १८१० भारतीय सैनिकांची आणि सुविधा केंद्रात मतदान केलेल्या ३४४२ मतदारांचे असे एकूण ९२३१ मतदारांच्या टपाली मत पत्रिकेची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू करण्यात येणार आहे .सकाळी साडेआठ वाजता मतदान यंत्राद्वारे करण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणीला सुरुवात होणार असल्याची माहिती डॉ. ओंबासे यांनी दिली.

डॉ. ओंबासे पुढे म्हणाले औसा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी हॉल क्रमांक 119 मध्ये 14 टेबलवर होणार असून मतमोजणीच्या 22 फेऱ्या उमरगा विधानसभा मतदारसंघाचे मतमोजणी हॉल क्रमांक 111 मध्ये 14 टेबलवर तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदानाची मतमोजणी हॉल क्रमांक 208 मध्ये 14 टेबलवर 29 फेऱ्यांमध्ये उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील मताची मतमोजणी हॉल क्रमांक दोनशे तीन मध्ये 14 टेबलवर 30 फेऱ्यांमध्ये परंडा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी हॉल क्रमांक 206 मध्ये 14 टेबलवर 27 फेऱ्यांमध्ये आणि बार्शी विधानसभा मतदारसंघाचे मतमोजणी हॉल क्रमांक 209 मध्ये 14 टेबलवर 24 फेऱ्यांमध्ये होणार आहे. टपाली मतपत्रिकेची मतमोजणी हॉल क्रमांक 124 आणि 127 मध्ये होणार असून या हॉलमध्ये प्रत्येकी आठ टेबलवर आणि भारतीय सैन्यातील कर्तव्यावर असलेल्या जिल्ह्यातील भारतीय जवानांच्या मतदानाची मतमोजणी हॉल क्रमांक 102 मध्ये सहा टेबलवर होणार असल्याची माहिती डॉक्टर उंबाशी यांनी दिली.

भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मतमोजणी केंद्राच्या शंभर मीटर अंतरापासून मतमोजणी केंद्रावर पायी चालत यावे लागणार असल्याची सांगून डॉ.  ओंबासे  म्हणाले मतमोजणी केंद्रावर वाहन पार्किंगची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे जागा देखील निश्चित करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रावर उमेदवार प्रतिनिधींना मोबाईल घेऊन जाण्यास प्रतिबंध राहणार आहे .मतमोजणी केंद्रावर सशुल्क भोजन व्यवस्था राहणार आहे मतमोजणीसाठी जवळपास पंधराशे अधिकारी कर्मचारी असतील विधानसभा मतदारसंघ निहाय सहा सभागृहात मतमोजणीचे काम 1200 अधिकारी कर्मचारी करणार आहेत. शासकीय तंत्रनिकेतन येथे सहा मोठे सभागृह असल्यामुळे मतमोजणीची अतिशय चांगली व्यवस्था उपलब्ध आहे . ईव्हीएम मशीन ज्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले आहेत तेथून ते मतमोजणी कक्षा पर्यंत सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अधिनस्त अधिकारी कर्मचारी मतमोजणी करून ती एक्सेल शीट तसेच मॅन्युअल मध्ये करून खात्री करून एन्कोर ॲपवर अपलोड करतील ही माहिती थेट ई सी आय डॉट जीओव्ही डॉट इन या आयोगाच्या संकेतस्थळावर पाहता येणार असल्याचे डॉ.ओंबासे  यांनी सांगितले.

तीन जून रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणी केंद्र येथे मतमोजणीची रंगीत तालीम होणार असल्याचे सांगून डॉक्टर ओंबासे म्हणाले मतमोजणी केंद्रावर माध्यमांच्या प्रतिनिधींना व्यवस्थित वृत्त संकलन करता यावे यासाठी माध्यम कक्ष हॉल क्रमांक 103 मध्ये सुरू करण्यात येणार आहे ज्या माध्यमाच्या प्रतिनिधी व त्यांच्या कॅमेरामन कडे भारत निवडणूक आयोगाचे विविध नमुन्यातील प्राधिकार पत्र दिले आहे केवळ त्यांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश देणार आहे.

माध्यम  प्रतिनिधींना मतमोजणीचे वृत्त संकलन करताना अडचण येऊ नये यासाठी त्यांना मोबाईल कॅमेरा व व्हिडिओ कॅमेरा व संबंधित साहित्य मतमोजणी केंद्रात घेऊन जाता येईल मात्र यासाठी जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात कोणते साहित्य मतमोजणी केंद्रावर घेऊन जाणार आहात याबाबतची लेखी स्वरूपात कळवावी लागणार आहे. लेखी कळविल्यानंतरच जिल्हा माहिती अधिकारी हे त्याबाबत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना लेखी स्वरुपात कळल्यानंतरच संबंधित माध्यमांचा प्रतिनिधींना साहित्य मतमोजणी केंद्रावर सोबत घेऊन जाता येणार असल्याचे माहिती त्यांनी यावेळी दिली.

डॉक्टर ओंबासे यावेळी  म्हणाले मतमोजणी केंद्रावर अधिकारी कर्मचारी व उमेदवार प्रतिनिधी यांना ओळखपत्राशिवाय प्रवेश मिळणार नाही मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी उमेदवार उमेदवार प्रतिनिधी राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक व पत्रकार बांधवांनी सहकार्य करण्याचे आव्हान डॉ. ओंबासे यांनी यावेळी केले. पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी मतमोजणी केंद्रावर पोलीस बंदोबस्त बाबत माहिती देताना म्हणाले 400 पोलीस कर्मचारी यांनी पन्नास पोलीस अधिकारी असा एकूण 500 पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त मतमोजणी केंद्रावर राहणार आहे .केंद्रीय राखीव पोलीस दल राज्य राखीव पोलीस दल आणि जिल्हा पोलिसांची त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था मतमोजणी केंद्रावर राहणार असून मतमोजणी केंद्रात मोबाईल सोबत घेऊन जाण्यास परवानगी राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments