तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथे सोळा वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू|
तुळजापूर: राहत्या घरात सापाने चावा घेतल्याने विषबाधा होऊन सोळा वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथे दि,१३ रोजी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथील शेतकरी लक्ष्मण काशिनाथ कबाडे यांची मुलगी प्रियंका लक्ष्मण कबाडे वय 16 हिचा राहत्या घरात सापाने चावा घेतल्याने विषबाधा होऊन मृत्यू झाला झाला शेतकरी लक्ष्मण कबाडे यांची मुलगी प्रियंका गुरुवारी रात्री घरात झोपली असता तिला काहीतरी चावल्याची जाणीव झाली, यामुळे त्रास होत असल्याने प्रियंकाला प्रथम अणदुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. त्यानंतर येथील डॉक्टरांनी तिला तपासून नळदृग येथील उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी सांगितले तेथे गेल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून प्रियंकाला सोलापूर येथे उपचारासाठी देण्यास सांगितले. दरम्यान सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात प्रियंकाला दाखल करण्यात आल्यानंतर तेथील डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. वास्तविक पाहता प्रियंकावर वेळेत उपचार झाले असते तर तिचे प्राण वाचले असते .,परंतु प्रथम अणदुर नंतर नळदृग व अखेर सोलापूर अशी उपचारासाठी हेळसांड होऊन वेळ वाया गेल्याने उपचारा अभावी तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातलगाकडून करण्यात आला आहे .तसेच नळदृग येथील रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळून अनेक वर्षे झाली परंतु सोयी सुविधांचा व उपचारांचा अभाव असल्याने हे उपजिल्हा रुग्णालय म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी अडचण झाल्याची ओरड परिसरातील नागरिकांतून होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे खुदावाडी ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे प्रियंकाने नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती.
0 Comments