Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील चिवरी परिसरात खरीप पेरण्यांना वेग, सोयाबीन लागवडीकडे शेतकऱ्यांकडे सर्वाधिक कल

तुळजापूर तालुक्यातील  चिवरी परिसरात खरीप पेरण्यांना वेग, सोयाबीन लागवडीकडे शेतकऱ्यांकडे सर्वाधिक कल


चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी परिसरात मागील आठवड्यामध्ये समाधानकारक पाऊस पडल्यामुळे खरीप पेरण्यांना वेग आला आहे. परिसरातील येवती, आरळी, काळेगाव चिंचोली ,बसवंतवाडी, तीर्थ ,मानेवाडी, हगलूर आदी परिसरातील शेतकरी खरीपाच्या पेरण्या करण्यात गुंतला आहे. परिसरात अनेक वर्षापासून पेरणीच्या वेळी हुलकावणी देणाऱ्या पावसाने यावर्षी दमदार हजेरी लावल्याने खरिपातील सोयाबीन मुग तूर उडीद आधी पिकांची पेरणी करत आहेत. तर शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती सोयाबीन लागवडीकडे दर्शवली आहे. त्यातच बैलजोड्यांची संख्या घटल्याने शेतकऱ्याकडून ट्रॅक्टरला सर्वाधिक मागणी वाढली आहे. मागील वर्षी पावसाच्या कमी प्रमाणामुळे खरीप हंगाम वाया गेला होता, थोड्याफार झालेल्या पावसामुळे काही पिके पदरात पडली होती मात्र उत्पन्नाला मोठा आर्थिक फटका बसला. त्यातच सोयाबीन सह इतर शेतमालाचे पडलेले भाव, महागलेले खते ,बियाणे यामुळे शेतकरी अधिकच आर्थिक विवंचनेत सापडला आहे. एकंदरीत शेतकऱ्याकडे खरीप पेरणी करण्यासाठी पैशाची चणचण असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

Post a Comment

0 Comments