मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना -माहेरच्या कागदपत्रांसाठी बहिणीचे भावाला साकडे
धाराशिव: लाडकी बहीण योजनेत आपला समावेश व्हावा यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये जन्मतारखेच्या दाखल्याचा विशेष पुरावा मानला जातो यासाठी लाडक्या बहिणीला आपल्या भावाच्या घरी जाऊन आपण ज्या शाळेत होतो तिथून हा दाखला प्राप्त करावा लागत आहे यातच अनेक महिलांनी राज्य परिवहन महामंडळाची मोफत बस प्रवास सेवा आहे.तीचा लाभ मिळावा यासाठी जन्मतारखेत बदल केला होता त्यामुळे त्यांना वंचित राहावे लागत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील दीड हजार रुपयांचा धर्माला मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्राची जुळवाजवळ केली जात आहे बहिणीला आपले दैनंदिन कामकाज सोडून थेट माहेरीकडे जावे लागत आहे जन्म तारखेसह शाळा सोडल्याच्या दाखल्या करिता चक्रा माराव्या लागत आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये जन्माचा पुरावा गरजेचा आहे जन्मदाखला अथवा शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जन्मतारीख नमूद कागदपत्रासाठी बहिणींना माहेरची आठवण होत आहे मुलींचे लग्न होऊन त्या आपल्या सासरी नांदायला गेले आहेत यामुळे त्यांना आता या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कागदपत्राची गरज भासत आहे. बहिणींना माहेरी मुक्कामी राहून ग्रामपंचायत मध्ये जन्मदाखला न मिळाल्यास शाळेत कोणत्या वर्षी दाखल झाले कुठल्या वर्षी शाळा सुली हे तपासण्यासाठी शालेय रजिस्टरमध्ये शोधाशूट केली जात आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत आहे ही योजना 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांसाठी आहे यासाठी आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र जन्म दाखला सक्षम प्राधिकरण दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला बँक पासबुक पासपोर्ट फोटो रेशन कार्ड हमीपत्र आधी कागदपत्रे आवश्यक आहेत. काही दिवसांपूर्वीच शाळा उघडले आहेत यामध्ये नवीन प्रवेश देणे शाळा सोडून जाणाऱ्यांना उत्तीर्ण दाखला शाळा सोडल्याचा दाखला शाळा सोडण्याचा दाखला देण्याची काम सुरू आहे यात पुन्हा लाडकी बहिणीचा भार शिक्षकावर पडला आहे अनेक वर्षापूर्वी शाळा सोडल्याचा दाखला काढण्यासाठी गर्दी होत आहे
55 ते 65 वयोगटातील महिलांनी मोफत प्रवासासाठी आधार कार्ड वरील वयात बदल केला असल्याने त्यांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही या योजनेच्या कागदपत्रासाठी जन्मतारखेच्या दाखल्याचा विशेष पुरावा मानला जातो जन्मदाखला मिळवण्यासाठी आता लाडक्या बहिणीला माहेरी आपल्या भावाच्या घरी जाऊन आपण ज्या शाळेत होतो त्या शाळेतून दाखला प्राप्त करावा लागत आहे ज्या बहिणीने राज्य परिवहन महामंडळाची मोफत बस प्रवास सेवा सवलतीचा लाभ मिळावा यासाठी आधार कार्ड वरील जन्मतारखेत बदल केला होता आता तो बदल अंगाशी आला असल्याने जन्म दाखल्यासाठी माहेरी धाव घेतली आहे.
0 Comments