शासनाच्या तुटपुंज्या अनुदानात घरकुलाचे बांधकाम होईना, अनेक घरे अपूर्ण अवस्थेत अनुदान वाढवण्याची मागणी|pantpradhan gharkul aawas yojna
धाराशिव: शासनाकडून पंतप्रधान आवास योजना शबरी आवास योजना रमाई आवास योजनांच्या माध्यमातून घरकुलासाठी अनुदान दिले जाते मात्र लाभार्थ्यांना मिळत असलेले अनुदान अत्यंत तुटपुंजे आहे दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तू सह साहित्याचे भाव वाढत आहेत अलीकडे विटा, रेती , मजुरी ,सिमेंट ,लोखंड आदी साहित्याची झालेली दरवाढ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे., किमान 500 चौरस फूट घर बांधण्यासाठी मोठा खर्च येत आहे त्यामुळे जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांची घरकुल अपूर्ण अवस्थेत आहेत.
शासनाकडून लाभार्थ्यांना घरकुलाची अनुदान देण्याची प्रक्रिया ही किचकट आहे ,पहिला टप्पा बांधल्यावर दुसऱ्या टप्प्याचे अनुदान दिले जाते मात्र अनेकांचे बजेट पहिल्या टप्प्यातच कोलमडुन जाते. घरकुलाचे अनेक लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील आहेत त्यामुळे त्यांना आर्थिक अंदाज घेऊनच घरकुलाचे बांधकाम करावे लागते सर्व कागदपत्राची जुळवाजवळ केल्यानंतर घरकुलाच्या कामाला मंजुरी मिळते 25 हजारात घराच्या पहिल्या टप्प्यात बांधकाम करावे लागते. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून अनुदान देण्यात येते त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे काम असल्यास पर्यंत आल्यानंतर अनुदान मिळते मात्र दुसऱ्या टप्प्याचे अनुदान मिळण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. दुसऱ्या टप्प्यातच अनेकांचे घरकुल अपूर्ण असल्याचे दिसून येत आहे या अडचणीवर मात करून तिसऱ्या टप्प्याचे अनुदानासाठी शासकीय कार्यालयाची उंबरठे झिजवावे लागत असून शासनाकडून मिळणाऱ्या एक लाख तीस हजार रुपयांमध्ये आपले घर बांधणे शक्य आहे का असा प्रश्न लाभार्थ्यांना पडत आहे ., त्यामुळे अनुदानात वाढ करण्याचा शासनाला विसर कसा काय पडला असा प्रश्न लाभार्थ्याकडून उपस्थित केला जात आहे. शासनाने बांधकामाच्या वाढलेल्या खर्चानुसार घरकुल अनुदानात वाढ करण्याची मागणी जिल्ह्यातील शेकडो लाभार्थ्यातून केली जात आहे.
0 Comments