धनादेश अनादर प्रकरणी पती-पत्नीस दंडासह तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा
छत्रपती संभाजीनगर : धनादेश न वटल्या प्रकरणी पैठण येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीमती अपर्णा रोकडे यांनी बिडकीन येथील आरोपी पती-पत्नीस एक लाख 40 हजार दंड व तीन महिने साधा कारावास तसेच दंड न भरल्यास एक महिन्याचा सक्षम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.
या प्रकरणात आरोपी पती-पत्नी चंद्रकला मानकापे व प्रभू मानकापे यांनी फिर्यादी अंकुश राठोड यांच्याकडून एक लाख तीस हजार रुपये घरगुती कामासाठी हात उसने घेतली होती नंतर सदर रक्कम परत करणे ऐवजी त्यांना या रकमेपुटी धनादेश दिला होता परंतु सदर धनादेश अनादरीत झाला त्यामुळे फिर्यादी राठोड यांनी ऍडव्होकेट प्रथम साबू यांच्यामार्फत धनादेश अनादर प्रकरण पैठण न्यायालयात दाखल केली होती सदर प्रकरणात दोन साक्षीदार तपासण्यात आले दोन्ही पक्षांचा युक्तिवाद व साक्षीदार यांनी दिलेली साक्षी याचा विचार करून न्यायालयाने उपरोक्त आरोपी पती-पत्नीस वरील प्रमाणे शिक्षा ठरवली आहे. सदर प्रकरणात फिर्यादीतर्फे एडवोकेट प्रीतम बाप साबू यांनी काम पाहिले त्यांना एडवोकेट सारिका तोतला साबू यांनी सहकार्य केले.
0 Comments