Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की सौर ऊर्जा प्रकल्पांतर्गत शासनास करोडोचा चुना, जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे मागितली मार्गदर्शन तहसीलदारांना आदेश जारी करण्याची मागवली माहिती प्रकल्पाचे गाव कंपनी निहाय माहिती देण्याची निर्देश|pawanchakki project saururja project

धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की सौर ऊर्जा प्रकल्पांतर्गत शासनास करोडोचा चुना, जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे मागितली मार्गदर्शन तहसीलदारांना आदेश जारी करण्याची मागवली माहिती प्रकल्पाचे गाव कंपनी निहाय माहिती देण्याची निर्देश


धाराशिव: जिल्ह्यात पवनचक्की व सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्यांनी अकृषी कराचा भरणा न करता शासनास करोड रुपयाचा चुना लावला आहे ऊर्जा व महसूल विभागाच्या निर्णयास सुस्पष्टता नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे .त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी बिगर शेती कर वसूल करावा की माफ करावा याबाबत महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांना पत्र देऊन मार्गदर्शन मागवली आहे दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी सर्व तहसीलदार यांना लेखी पत्र काढून पवनचक्की व सौर ऊर्जा प्रकल्पाची गाव व कंपनीने हा माहिती तात्काळ देण्याची आदेश दिले आहेत

शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने 30 जून 2022 च्या अध्यादेश काढून अपरंपारिक ऊर्जा प्रकल्पना प्रोत्सानात्मक सुधारणा व आर्थिक साही देण्यासाठी काही सवलती दिली आहेत त्यानुसार सौरभ पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी बिगर शेती कर माफ करण्यास मान्यता दिली आहे मात्र महसूल व वन विभागाचा बिगर शेती करमापी बाबत कोणताही शासन निर्णय असल्यामुळे कर माफ करावा किंवा कसे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी डाॅ.ओंबासे यांनी याबाबत सरकारकडे मार्गदर्शन मागवली आहे. जिल्ह्यात विविध कंपन्याकडून पवनचक्की ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे त्यासाठी ते ऊर्जा विभागाच्या निर्णयाचा आधार घेत प्रकल्पास अकृषी कर भरण्याची आवश्यकता नसल्याची धाराशिव जिल्हाधिकारी कार्याला कळविले आहेत राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाचा 2022 चा निर्णय असला तरी त्यापूर्वी अनेक सौर व पवनचक्की प्रकल्प सुरू झाली आहेत त्यातील अनेकांनी अक्रशी कर भरला नाही तो तपासून वसूल करणे गरजेचे आहे धाराशिव जिल्ह्यात सौर ऊर्जा व पवनचक्की प्रकल्प फार पूर्वीपासून कार्यरत आहे., मात्र त्यांची आकडेवारी काय त्यांनी अकृषी परवाना घेतला का? किती कर भरला? यासंदर्भात कोणतीच माहिती महसूल विभागाकडे उपलब्ध नाही जिल्ह्यात जवळपास दहा कंपनीने शिरकाव केला असून काम सुरू केले आहे त्या कंपन्यांना कामगार पुरविणे बांधकामाचे साहित्य काम व सुरक्षा पुरवण्याच्या नावाखाली टोळी युद्ध सुरू झाले असून तीन ते चार गॅंग सक्रिय झाले आहेत यातून गोळीबार हाणामारी यासारखे प्रकार जिल्ह्यात वाढले आहेत.

Post a Comment

0 Comments