श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये श्री. ज्ञानेश्वर मिडगुले यांचे व्याख्यान
धाराशिव : येथील श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धाराशिव मध्ये श्री. मुक्ताई विश्वसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक व अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर लिंबाजी मिडगुले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी श्री. मिडगुले यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना शिक्षणाला भक्तिमार्गाची जोड दिल्यास आपल्या जीवनाला एक अर्थ प्राप्त होईल असे सांगितले. व्याख्यानात श्री. मिडगुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले अशा महापुरुषांच्या जीवनातील प्रसंगांचे विविध दाखले देऊन त्यांचे समाज व देशासाठी असलेले योगदान याविषयी माहिती दिली. नवी पिढी हुशार आहे पण जे चांगले ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि नको त्या गोष्टी डीजे, ऑर्केस्ट्राचा आवाज ऐकताच क्षणात बिघडतात. विज्ञान, तंत्रज्ञानाचे युग असले तरी मोबाईल, टीव्ही, गेमींग, कुसंगतीने दुर्व्यसनांच्या चक्रव्यूहात सापडतात. मुलांना शिक्षणाबरोबरच संस्कारांचीही गरज आहे. मी कमी हुशार आहे, माझी परिस्थिती गरिबीची आहे, माझं कसं होईल ही भीती व विद्यार्थ्यांमधील न्युनगंड हटवून आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी छत्रपती शिवराय, संत, समाजसुधारकांचा इतिहास, अध्यात्म, परमार्थ, सुसंस्काराची गरज भासते असे त्यांनी सांगितले.
यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री. एन. आर. नन्नवरे सर होते. या कार्यक्रमासाठी श्री दत्तात्रय भुजबळ, श्री मुक्ताई प्रतिष्ठान यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. डी. वाय. घोडके सर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष श्री. सुधीर आण्णा पाटील सर, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आदित्य पाटील सर, संस्थेच्या सरचिटणीस सौ. प्रेमाताई सुधीर पाटील, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. एस. एस. देशमुख सर, प्राचार्य श्री. एन. आर. नन्नवरे सर, उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे सर, पर्यवेक्षक श्री. एम.व्ही. शिंदे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाने केले.
0 Comments