Hot Posts

6/recent/ticker-posts

चुलत्याच्या डोक्यात दगड घालून खून आरोपी पुतण्यास आजन्म कारावासाची शिक्षा धाराशिव जिल्हा न्यायालयाचा निकाल |Dharashiv District Court verdict for life imprisonment to the nephew accused of murdering cousin by throwing a stone on his head

चुलत्याच्या डोक्यात दगड घालून खून आरोपी पुतण्यास आजन्म कारावासाची शिक्षा धाराशिव जिल्हा न्यायालयाचा निकाल 


धाराशिव: चुलत्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी आरोपी पुतण्यास जन्म कारावास व 35 हजार रुपयांच्या द्रव्य दंडाची शिक्षा ठोकवण्यात आली धाराशिव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.एस .गुप्ता यांनी मंगळवारी दिनांक 13 रोजी हा निकाल सुनावल्याची माहिती जिल्हा शासकीय अभियोक्ता महेंद्र देशमुख यांनी दिली.

या घटनेची हकीगत थोडक्यात अशी की नळदुर्ग  येथील खंडू लक्ष्मण कोळी (वय 26) वर्षे यांनी 25 फेब्रुवारी 2022 रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली की चुलते संजय हनुमंत कोळी हे 24 फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता टपरी बंद करून दररोजच्या प्रमाणे घरी आले नव्हते, दरम्यान त्याचा मित्र किरण मरके यांनी फोनवरून सांगितले की आरोपीचा काका संजय कोळी हे पाटील मळ्याजवळील कॅनोल मध्ये पडून माहित झाली आहेत त्यामुळे आरोपी खंडू यांनी तेथे जाऊन पाहिले असता बरेच लोक जमा झाले होते मयताच्या मरणाबाबत कोणावरही संशय अगर तक्रार नाही असं जवाब आरोपी खंडूने पोलिसांसमोर दिला होता .याप्रकरणी अकस्मित मृत्यूची नोंद झाली होती मयत संजय याचा भाऊ लक्ष्मण हनुमंत कोळी यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी 27 फेब्रुवारी 2022 रोजी फिर्याद दिली फिर्यादीचा मुलगा रवी याच्या मोबाईलवर त्याच्या गल्लीतील कल्पना गायकवाड यांनी फोन करून पाटील यांच्या शेतातील बोरी धरणाच्या कॅनॉलच्या पाण्यात संजय कोळी मयत अवस्थेत पडल्याची सांगितले होते. फिर्यादी व त्याचा मुलगा रवी यांनी तिथे जाऊन पाहिले असता संजय कोळी मयत अवस्थेत दिसले त्याचा डावा डोळा कानाच्या मध्यभागी तसेच डोक्याला मार लागून रक्त आले होते त्यामुळे याप्रकरणी फिर्यादी लक्ष्मण कोळी यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्यादी दिली होती .

त्यावरून खुनाचा गुन्हा नोंद झाला होता या गुन्ह्याच्या तपासामध्ये मयत संजय हनुमंत कोळी राहणार (नळदुर्ग)  व त्याचा पुतण्या आरोपी खंडू हे 24 फेब्रुवारी 2022 रोजी एका बारमध्ये आरोपीच्या रिक्षातून आल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये निष्पन्न झाले. आरोपी मयत व चांद दाऊद नदाफ हे दारू पिऊन रिक्षातून निघून गेल्याची देखील सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसले होते संजय कोळी यांनी घरी एका महिलेला आणून ठेवल्यामुळे पुतण्या खंडू यांनी त्याच्याशी भांडण करून मारहाण केली यावेळी दगडाने डोक्यात मारहाण केल्याने गंभीर जखमी होऊन संजय याचा मृत्यू झाल्याची पोलीस तपासात निष्पन्न झाली.

 त्यामुळे याप्रकरणी खंडू कोळी यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला होता. धाराशिव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली या सुनावणीत एकूण 15 साक्षीदार तपासण्यात आले साक्ष पुराव्यानंतर समोर आलेली बाजू व शासकीय अभियोक्ता देशमुख यांनी केलेला भक्कम व्यक्तीवर गृहीत धरून न्यायालयाने आरोपी खंडू लक्ष्मण कोळी  यास जन्म कारावास व व 35 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी कोर्ट पैरवी म्हणून पोलीस उपनिरीक्षक म्हेञे यांनी साह्य केले.

Post a Comment

0 Comments