तुळजापूर शहरातील जिजाऊ माँ साहेब यांच्या पुतळा स्मारकासाठी तात्काळ वाढीव निधी उपलब्ध करण्यात यावा: आपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके यांची मागणी-tuljapur maisaheb jijau statue

Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर शहरातील जिजाऊ माँ साहेब यांच्या पुतळा स्मारकासाठी तात्काळ वाढीव निधी उपलब्ध करण्यात यावा: आपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके यांची मागणी-tuljapur maisaheb jijau statue

तुळजापूर शहरातील जिजाऊ माँ साहेब यांच्या पुतळा स्मारकासाठी तात्काळ वाढीव निधी उपलब्ध करण्यात यावा: आपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके यांची मागणी
तुळजापूर:   शहरातील जिजाऊ माँ साहेब यांच्या पुतळा स्मारकासाठी तात्काळ वाढीव निधी उपलब्ध करण्यात यावा अशी मागणी आम आदमी पार्टी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके यांनी निवेदनाद्वारे नगरपरिषद तुळजापूर यांच्याकडे दि,१९ रोजी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे की, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीसाठी राजमाता जिजाऊंनी प्रेरणा दिली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली.  छत्रपती शिवाजी महाराजांचे संगोपन करुन देशप्रेमाचे धडे देणा-या अश्या माँ जिजाऊ माता यांच्या पुतळासाठी 30 ते 35 वर्ष पाठपुरावा केला अखेर नगर परिषद च्या वतीने 16 सप्टेंबर 2021 रोजी ठराव घेत सर्वानुमते मंजूर केले.

तुळजापूर शहरातील जिजामाता नगर शुक्रवार पेठ तुळजापूर येथे राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या स्मारकाचे काम चालू असून स्मारकासाठी 4.5 लाख  रुपये मंजूर असून तो निधी या कामा साठी अपुरा पडत असून अपुऱ्या निधीमुळे बांधकामाच्या दर्जेवर प्रश्न उपस्थित होतील. सुसज्ज्य व दर्जेदार स्मारक व्हावा ही जिजाऊ भक्तांची मागणी असून कामासाठी वाढीव निधी उपलब्ध करून देऊन दर्जेदार व सुसज्ज्य असे स्मारक बांधान्यात यावे. स्मारकासाठी वाढीव निधी संदर्भात तात्काळ दखल घेऊन तातडीने कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती, अशी निवेदनात नमूद केले आहे.




 



Post a Comment

0 Comments