अणदुर येथे कृषी विभागाच्या वतीने बॅटरी चलीत फवारणी पंपाचे मोफत वाटप
अणदुर :महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने बॅटरी चलीत फवारणी पंपाचे मोफत वाटप अणदुर येथे दि,१३ रोजी करण्यात आले. राज्य पुरस्कृत कापूस सोयाबीन व तेलबिया पीक उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विशेष कृती योजना अंतर्गत कृषी विभाग तुळजापूर मंडळ कृषी अधिकारी अणदुर या कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या 29 गावांमध्ये ऑनलाइन पद्धतीने ज्यांनी नोंदणी केली होती व ज्यांची लॉटरी प्रक्रिये मार्फत निवड करण्यात आली त्या सर्व पात्र शेतकरी लाभार्थ्यांना अणदुर येथील कार्यालयामधून बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचे मोफत वितरण करण्यात आले .यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्री पी.पी. सरडे व सर्व कृषी सहाय्यक, शेतकरी लाभार्थी उपस्थित होते.
0 Comments