Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर शहरातील पालिकेने कचरा साफसफाई स्वच्छता समस्या सोडवावी

तुळजापूर शहरातील पालिकेने कचरा साफसफाई स्वच्छता समस्या सोडवावी

"स्वच्छ शहर सुंदर शहर" बनवावे आपचे जिल्हाउपाध्यक्ष  मधुकर शेळके यांची निवेदनाद्वारे मागणी


तुळजापूर :  तुळजापूर शहरातील कचरा साफसफाई स्वच्छता समस्या सोडवीणे व डास प्रतिबंधक फवारणी करणे बाबत दि.२ सप्टेंबर रोजी आम आदमी पार्टी धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके यांनी मकचरा कुंड्या व्यवस्थीत नाहीत नागरीक परेशान आहेत याकडे मुख्याधिकारी स्वत :लक्ष द्यावे,शहरातील स्वच्छते संदर्भ बाबत स्वत स्थळ पाहणी करावी. नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात किटक प्रतिबंधक फवारणी नियमीत व प्रभागनिहाय करण्यात यावी त्याच्या नोंदी ठेवा व्यात, साफसफाई नियमीतपणे करण्यात यावी, घंटा गाडी नियमीत पाठवावी. तरी वरील निवेदनाची दखल घेउन शहर स्वच्छता साफस फाई व डास मच्छर प्रतिबंधक फवारणी निमीत करण्यात यावी. 

याबाबत १५ दिवसात योग्य उपाययोजना करून शहर स्वच्छता साफसफाई बाबत योग्य सुधारणा नाही केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करून नगर परिषद समोर उपोषणास बसणार असल्याचा एका लेखी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.या निवेदनावर मधुकर शेळके यांची स्वाक्षरी आहे.


Post a Comment

0 Comments